हृतिक रोशन म्हणतो, काबिल म्हणजे गडद अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2017 09:09 AM2017-01-27T09:09:12+5:302017-01-27T14:39:12+5:30

हृतिक रोशनचा ‘काबिल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हृतिकचा चित्रपट म्हटला की त्याचे नृत्य, त्याची स्टाईल असा सारा काही मामला ...

Hrithik Roshan says, going from dark darkness to light | हृतिक रोशन म्हणतो, काबिल म्हणजे गडद अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

हृतिक रोशन म्हणतो, काबिल म्हणजे गडद अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

googlenewsNext
हृतिक रोशनचा ‘काबिल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हृतिकचा चित्रपट म्हटला की त्याचे नृत्य, त्याची स्टाईल असा सारा काही मामला असतो. विविध भूमिका करीत असताना वेगळे करण्याची संधी त्याला या चित्रपटात मिळाली. अंध व्यक्तीची भूमिका साकारताना त्याच्या काय भावना आहेत किंवा आपल्या भूमिकांना तो कसा न्याय देतो, याबाबत त्याने सीएनएक्स लोकमतच्या संपादक जान्हवी सामंत यांच्याशी केलेली बातचीत.


काबिलसाठी कशी तयारी केली होतीस?
-तयारी म्हटले तर खूप भयानक होती. मी बºयाच वर्षांनंतर अशा भूमिका करीत होतो. मी ज्यावेळी हा चित्रपट हातात घेतला, त्यावेळी मला आश्चर्य वाटले. कोई मिल गया, गुजारिशनंतर अशाप्रकारचे चित्रपट मी केले. परंतु मी जेव्हा कामास सुरुवात केली, त्यावेळी चित्रपट आणि त्यातील माझ्या पात्रासाठीचा उत्साह आणि वेग हा खरोखर सुंदर होता. मी हे काम खूपच आनंदाने केले.

गेल्या अनेक वर्षांपासून तू काम करतो आहेस. अशाप्रकारच्या भूमिका करणे तुला आता सोपे आहे? तुझा पहिला चित्रपटसुद्धा तू सहज केला होतास?
-नाही! पहिला चित्रपट करताना मला खूप अडचणी आल्या होत्या. मी माझ्या स्वत:च्या बाबतीत खात्रीशीर नव्हतो. सध्या ज्या पद्धतीने मी काम करतो आहे, त्यापेक्षा पूर्वी कठीण होते. आता मी खात्री देऊ शकतो. पूर्वी असे सांगता यायचे नाही. आता तुम्ही जर खूप परिश्रम घेतले तर यश मिळण्याची जरूर शक्यता आहे.

चित्रपटांमधील भूमिकांमधून तू काय शिकलास?
-मी खूप काही शिकलो. स्वत:वर संयम राखणे शिकलो. मी कॅमेºयापुढे जाताना खूप घाबरायचो. कॅमेºयासमोर गेल्यानंतर मी आता माझे संवाद म्हणू शकतो. काबिल चित्रपटाने मला बरेच काही शिकविले.

या चित्रपटात तुझे डार्क कॅरेक्टर आहे?
-मी याला ब्रायटेस्ट कॅरेक्टर असे म्हणेन. एका गडद अंधाºया युगातून जाणारा प्रवास. प्रकाश, गडद अंधार आणि पुन्हा प्रकाश असेच काही या चित्रपटात तुम्हाला पाहता येईल.

या चित्रपटाच्या कथानकात किती गुंतलेला आहेस?
-संजय गुप्ता हे माझ्याकडे कथानक घेऊन आले होते. मला संजय गुप्ता यांचा खूप अभिमान वाटतो. हा माझा आवडता चित्रपट आहे. संजय गुप्ता हेच असा चित्रपट करू शकत होते. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने चित्रपट तयार केलाय.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून भारतीय सिनेमांमध्ये अनेक बदल झाले आहेत. तू कशा पद्धतीचे चित्रपट स्वीकारतोस?
-मी माझे सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. मी चित्रपट छोटा आहे, एका तासाचा आहे हे पाहत नाही. मला काम करायचेय. मी कोणताही सिनेमा करावयास तयार आहे. 

तू मराठी सिनेमा पाहिलास?
-नाही. मला प्रियंका चोप्राचा सिनेमा पाहावयाचा होता. रितेश देशमुखचाही सिनेमा मी पाहू शकलो नाही. मला मराठी येत नाही.

तू काबिलमध्ये नृत्य केले आहेस?
-मी या चित्रपटात खूप नाचलो आहे. त्याशिवाय माझ्या आवडत्या डान्स स्टेप्सही आहेत.

चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
-सुरुवातीला मला खूप वाईट वाटले. मला अंधांसाठी काहीतरी करायचे आहे. समाजासमोर मला सत्य आणायचेय. त्यांच्याप्रति केवळ सहानुभूती बाळगता कामा नये. त्यांच्याकडे धाडस आहे, कोणतीही आव्हाने ते स्वीकारतात. गायक, वकील सर्व काही आहेत. तुम्ही ज्यावेळी मला किंवा गौतमीला पाहाल तेव्हा सहानुभूती न बाळगता अगदी सहजगत्या पाहाल.

चित्रपट तयार करतानाचा काही अनुभव?
-मी इतकेच सांगेन, आमच्या संपूर्ण टीमने खूप चांगले काम केले आहे. सेटवर काम करताना खूप छान अनुभव आला. 

कामाचा दबाव आहे? पुढे दिग्दर्शन करणार? काबिलनंतर पुढे काय?
-मला दबाव आवडतो. मी सध्या जो आहे तिथेच योग्य आहे. दिग्दर्शनाचा विचार नाही. काबिलनंतर काय करणार हे माहिती नाही.

Web Title: Hrithik Roshan says, going from dark darkness to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.