भावा, का जगाला मूर्ख बनवतोस? चक्क बुर्ज खलिफावर ‘स्टंट’, हृतिक रोशन झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 03:11 PM2021-12-21T15:11:49+5:302021-12-21T15:21:25+5:30

Hrithik Roshan rides bike from Burj Khalifa : होय, एका सॉफ्ट ड्रिंकची हृतिक रोशनची नवी जाहिरात सध्या चर्चेत आहे. ही जाहिरात पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये.

hrithik roshan rides bike from burj khalifa in mountain dew new add netizens trolls | भावा, का जगाला मूर्ख बनवतोस? चक्क बुर्ज खलिफावर ‘स्टंट’, हृतिक रोशन झाला ट्रोल

भावा, का जगाला मूर्ख बनवतोस? चक्क बुर्ज खलिफावर ‘स्टंट’, हृतिक रोशन झाला ट्रोल

googlenewsNext

बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ या नावानं ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan ) सध्या चांगलाच ट्रोल होतोय. होय, नेटकरी त्याची चांगलीच मजा घेत आहेत. कारण काय तर हृतिकचा स्टंट. अर्थात जाहिरातीतला. होय, एका सॉफ्ट ड्रिंकची हृतिक रोशनची नवी जाहिरात सध्या चर्चेत आहे. यापूर्वीही याच ब्रँडच्या जाहिरातीत हृतिक खतरनाक स्टंट करताना दिसला आहे. पण यावेळी जरा अतिचं झालं. होय, ही जाहिरात पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये.

जाहिरातीत  हृतिक जगातील सर्वात उंच टॉवर बुर्ज खलीफावरुन (Burj Khalifa) बाईक चालवत खाली येतांना दिसतोय. एका अरूंद ट्रॅकवरुन बाईक चालवत तो बुर्ज खलिफावरुन खाली उतरतो आणि सरतेशेवटी ‘डर के आगे जीत है,’ असा संदेश देतो. पण सध्यातरी ही जाहिरात लोकांच्या पचनी पडलेली दिसत नाहीये. लोकांनी या जाहिरातीची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

 ‘मतलब कुछ भी,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. हा स्टंट पाहून टॉम क्रूझ पृथ्वी सोडून गेला, अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली आहे. तर अन्य एकाने ‘डर के आगे जीत नाहीं, डायरेक्ट भगवान से मिलने का मौका है,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सर, हे जरा अती झालंय,’ ‘मला तर आधी क्रिश 4 चा टीजर वाटला’, भावा, जगाला मूर्ख का बनवतोस? अशा भन्नाट कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

लोकांना हृतिकची ही जाहिरात पचनी पडलेली नाही. पण हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान हिने मात्र ‘फॅब’ असं लिहित हृतिकचं कौतुक केलं आहे. हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर विक्रम वेधा व फायटर या सिनेमात तो दिसणार आहे.

Web Title: hrithik roshan rides bike from burj khalifa in mountain dew new add netizens trolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.