करिअरमधील पहिल्या बायोपिकसाठी सज्ज आहे हृतिक रोशन !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 12:48 PM2017-08-13T12:48:19+5:302017-08-13T18:19:27+5:30

‘काबिल’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर अभिनेता हृतिक रोशन त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत लागला आहे. हृतिक पटना येथील गणित विषयाचे प्रोफेसर ...

Hrithik Roshan is ready for his first biopic in career | करिअरमधील पहिल्या बायोपिकसाठी सज्ज आहे हृतिक रोशन !

करिअरमधील पहिल्या बायोपिकसाठी सज्ज आहे हृतिक रोशन !

googlenewsNext
ाबिल’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर अभिनेता हृतिक रोशन त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत लागला आहे. हृतिक पटना येथील गणित विषयाचे प्रोफेसर आनंदकुमार यांच्यावरील बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ‘क्वीन’फेम विकास बहल करणार आहेत. चित्रपटाचे नावही घोषित करण्यात आले असून, चित्रपटाचे नाव ‘सुपर ३०’ असे आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची शूटिंगही सुरू झाली आहे. गणितज्ज्ञ आनंदकुमार यांनी नुकतीच हृतिक आणि विकास बहल यांची भेट घेतली असून, त्यांच्याशी चित्रपटावर गप्पा मारल्या. त्याचबरोबर हृतिकला त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रणही दिले आहे. या भेटीचा एक फोटो आनंदकुमार यांनी सोशल मीडियावरही शेअर केला आहे. 

फोटो कॅप्शनमध्ये आनंदकुमार यांनी लिहिले की, ‘आताच मुंबई येथून पटनाला परत आलो आहे; मात्र हृतिक रोशनसोबत जी भेट झाली ती विसरणे शक्य नाही. हृतिकने मला घरी बोलावून जो सन्मान दिला, त्यावरून तो एक चांगला कलाकार आहेच शिवाय मोठ्या मनाचा मालकही आहे. धन्यवाद हृतिक !’ संपूर्ण चित्रपट आनंदकुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. ‘सुपर ३०’चे संस्थापक कशा पद्धतीने आयआयटीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करतात याबाबतचा प्रवास त्यामध्ये दाखविण्यात आला आहे. 

">


आनंदकुमार यांचा अकॅडमिक प्रवास पटना ते बिहार असा झाला आहे. दरवर्षी आनंदकुमार ३० पेक्षा अधिक आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना मुख्य परीक्षेसाठी तयार करतात. येथूनच विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाचा पहिला टप्पा गाठता येतो. ‘सुपर ३०’ हृतिक रोशनचा पहिला चित्रपट आहे. दरम्यान, हृतिकच्या ‘काबिल’ने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला होता. आता पुन्हा तो या बायोपिकमधून परतणार असून, प्रेक्षकांना त्याची आतुरता असेल यात शंका नाही. 

Web Title: Hrithik Roshan is ready for his first biopic in career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.