​कंगना राणौतच्या आरोपांवर का शांत आहे हृतिक रोशन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 10:23 IST2017-09-10T04:53:27+5:302017-09-10T10:23:27+5:30

कंगना राणौतने हृतिक रोशन, आदित्य पांचोली आणि अध्ययन सुमन यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केलेत. ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात ...

Hrithik Roshan is quiet on Kangana Ranaut's allegations | ​कंगना राणौतच्या आरोपांवर का शांत आहे हृतिक रोशन ?

​कंगना राणौतच्या आरोपांवर का शांत आहे हृतिक रोशन ?

गना राणौतने हृतिक रोशन, आदित्य पांचोली आणि अध्ययन सुमन यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केलेत. ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात कंगना आली आणि या सगळ्यांसोबतच्या रिलेशनशिपवर एकदम बिनधास्त बोलून मोकळी झाली. कंगनाने केलेले आरोप निश्चितपणे सगळ्यांनाच झोंबले. यानंतर आदित्य पांचोलीने थेट कंगनाला वेडे ठरवले तर अध्ययनने मला तिच्यासारख्या वात्रट मुलीच्या नादी लागायचे नाही, असे सांगत आपला संताप व्यक्त केला. आता उरला तो केवळ हृतिक रोशन. कंगनाने हृतिकवर  बरेच गंभीर आरोप केलेत. हृतिक सोबत माझे अफेअर होते, मी त्याच्याशी लग्न करायलाही तयार होते. हृतिकनेही पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर लग्नाची तयारी दर्शवली होती. पण नंतर तो पलटला आणि माझे पर्सनल मॅसेज व व्हिडिओ लीक करण्याची धमकी मला दिली, असे काय काय कंगना या शोमध्ये बोलली. हृतिकने माझी माफी मागावी, तोपर्यंत हा वाद थांबणार नाही, असेही ती यावेळी बोलून गेली. खरे तर कंगनाच्या या आरोपांवर हृतिकची प्रतिक्रिया अपेक्षित होती. पण अद्याप हृतिकने कंगनाच्या आरोपांवर एक अवाक्षरही काढलेले नाही.  



ALSO READ : हृतिक रोशन, आधी आम्ही तुझा आदर करायचो, पण आता...!!

आता हृतिक बोलत नाही म्हणजे, कंगना जे काही सांगतेय,ते सगळे खरे आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर ते खोटे आहे. होय, कंगनाच्या आरोपांवर हृतिक का शांत आहे, याचे कारण वेगळेच आहे. होय, हृतिकच्या या चुप्पीमागे त्याचा वकील आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हृतिकच्या वकीलाने त्याला या संपूर्ण प्रकरणावर एक शब्दही मीडियासमोर काढायचा नाही, असा सल्ला दिला आहे. कंगनाच्या आरोपांवर तोंड उघडणे महागात पडू शकते, असे म्हणे त्याच्या वकीलाने हृतिकला सांगितले आहे. त्यामुळेच कंगना इतके बोलूनही हृतिक शांत आहे. आता हृतिकची शांत वादळापूर्वीच शांतता न ठरो म्हणजे झाले.  तुम्हाला काय वाटते?
 

Web Title: Hrithik Roshan is quiet on Kangana Ranaut's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.