​हृतिक रोशन त्याच्या मित्राच्या मुलीसोबत करणार ऑनस्क्रीन रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 06:18 AM2018-01-27T06:18:05+5:302018-01-27T11:50:22+5:30

सैफ अली खान आणि हृतिक रोशनने १६ वर्षांपूर्वी न तुम जानो ना हम या चित्रपटात काम केले होते. हा ...

Hrithik Roshan with his friend's daughter onscreen romance | ​हृतिक रोशन त्याच्या मित्राच्या मुलीसोबत करणार ऑनस्क्रीन रोमान्स

​हृतिक रोशन त्याच्या मित्राच्या मुलीसोबत करणार ऑनस्क्रीन रोमान्स

googlenewsNext
फ अली खान आणि हृतिक रोशनने १६ वर्षांपूर्वी न तुम जानो ना हम या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हृतिक आणि सैफ दोघेही इशा देओलच्या प्रेमात पडतात असे आपल्याला पाहायला मिळाले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान सैफ अली आणि हृतिकमध्ये चांगलीच मैत्री झाली होती. आता सैफच्या मुलीसोबत हृतिक एका चित्रपटात झळकणार आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटात ती हृतिकची नायिका असणार आहे.
सारा खान धडक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. सारा अली खानला सुपर-३० या चित्रपटाची ऑफर आली असून सध्या ती याबाबत विचार करत असल्याची चर्चा आहे. साराने या चित्रपटासाठी होकार दिला तर हृतिक आणि सारा ही एक नवीन जोडी प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे सारा आणि हृतिक यांच्यामध्ये जवळजवळ २४ वर्षांचे अंतर आहे. हृतिक हा ४४ वर्षांचा आहे तर सारा ही केवळ २० वर्षांची आहे. सैफ अली हृतिकपेक्षा केवळ तीन वर्षांनी मोठा आहे. 

sara ali khan


सुपर ३० या चित्रपटात हृतिक एका शिक्षकाची भूमिका साकारतो आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ऋतिक या चित्रपटातील भूमिकाचा अभ्यास करतो आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून  पहिल्यांदा ऋतिक शिक्षकाची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून या चित्रपटातील दुसऱ्या कलाकाराच्या कास्टिंगला सुरुवात करण्यात आली आहे. ऋतिक यात गणिताचे जादूगर आनंद कुमार यांची भूमिका साकारतो आहे.  आनंद कुमार बिहारमध्ये ‘सुपर ३०’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आतापर्यंत अनेक गरीब आणि होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून निवडक ३० विद्यार्थी ते पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्याखाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी, भाऊ आणि आई मदत करतात. 

Also Read : ​ऋतिक रोशन पुन्हा एकदा चढणार बोहल्यावर?

Web Title: Hrithik Roshan with his friend's daughter onscreen romance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.