ऋतिक रोशनच्या काबिलचा बनणार का हॉलिवूड रिमेक ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 12:03 PM2017-07-18T12:03:16+5:302017-07-18T17:33:16+5:30

आतापर्यंत अनेक वेळा आपण हॉलिवूडचे चित्रपटांचा रिमेक बॉलिवूडमध्ये तयार होताना सरासपणे पहिले आहेत. मात्र आता एक वेगळी न्यूज आहे. ...

Hrithik Roshan to become a Hollywood remake? | ऋतिक रोशनच्या काबिलचा बनणार का हॉलिवूड रिमेक ?

ऋतिक रोशनच्या काबिलचा बनणार का हॉलिवूड रिमेक ?

googlenewsNext
ापर्यंत अनेक वेळा आपण हॉलिवूडचे चित्रपटांचा रिमेक बॉलिवूडमध्ये तयार होताना सरासपणे पहिले आहेत. मात्र आता एक वेगळी न्यूज आहे. फॉक्स इंटरनॅशनल ऋतिक रोशनचा चित्रपट काबिलचा हॉलिवूड रिमेक बनवण्याच्या तयारीत आहे. फॉक्स इंटरनॅशनलने चित्रपटाचे राइट्स विकत घेण्यासाठी ऋतिक रोशनला संपर्क केला आहे. गेल्या आठवड्यात ऋतिक रोशन न्यूयॉर्कमध्ये होता त्यावेळी प्रॉडक्शन हेडने याबाबत ऋतिकशी बातचित केल्याचे समजते आहे. संजय गुप्ताने या बातमीला दुजोरा दिला आहे. संजय गुप्ता म्हणाला की, ''हे खरं आहे की फॉक्सच्या थॉमस जीजसने ऋतिक रोशनशी यासंबंधी बोलणं केले आहे. आताच या संदर्भात काही बोलणं घाईच होईल मात्र ही गोष्ट चित्रपटाच्या टीमसाठी सन्मानाची आहे. ऑनलाईन पॉलमध्ये सुद्धा काबिल 2017चा सर्वोत्तम चित्रपट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटाची टीम  डबल सेलिब्रेशन करणार आहे.''     
ऋतिक रोशन या सगळ्याला घेऊन खूपच एक्साइटेड आहे. हॉलिवूडला लागणार सगळा मसाला काबिलमध्ये असल्याचे ऋतिकचे म्हणणे आहे. न्यूयॉर्कमधून परतल्यानंतर ऋतिक रोशन यासंदर्भात वडील राकेश रोशन यांच्याशी बोलणार आहे. स्वत: राकेश रोशनसुद्धा ही बातमी ऐकून खूश आहेत. आता असा प्रश्न असा उपस्थित होता की जर काबिल या चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये रिमेक तयार करण्यात आला तर त्यात ऋतिक रोशनची वर्णी लागणार का?, तो या चित्रपटाचा भाग असणार का ? या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील.
काबिल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमावला होता. यात ऋतिकसह यामी गौतमीची मुख्य भूमिका होती. काबिलमध्ये ऋतिकने साकारलेलारोहन भटनागर प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. 

Web Title: Hrithik Roshan to become a Hollywood remake?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.