हृतिक व सुजैन एकत्र!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 19:22 IST2016-05-01T13:52:33+5:302016-05-01T19:22:33+5:30
कंगनासोबतच्या वादात अडकलेला हृतिक रोशन आज अचानक सांताक्रूझ येथील JOSS Restaurant मध्ये दिसला. आता हृतिक रेस्टारंटमध्ये दिसला, यात नवल काय, ...

हृतिक व सुजैन एकत्र!!
क गनासोबतच्या वादात अडकलेला हृतिक रोशन आज अचानक सांताक्रूझ येथील JOSS Restaurant मध्ये दिसला. आता हृतिक रेस्टारंटमध्ये दिसला, यात नवल काय, असे तुम्ही म्हणाल. पण रेस्टॉरंटमध्ये त्याच्यासोबत कोण होते, माहितीयं??? होय, एक्स वाईफ सुजैन... आज हृतिक व सुझैन यांचा लहान मुलगा हृधान या वाढदिवस होता. यानिमित्त सुजैन व हृतिक यांनी एकत्र येत, हृधानचा वाढदिवस साजरा केला.बºयाच महिन्यानंतर हृतिक व सुजैन अशाप्रकारे एकत्र दिसल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. सध्या हृतिक कंगनासोबतच्या कायदेशीर वादात गुरफटला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर हृतिक आणि कंगना यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. यावेळी सुजैनने समोर येत, हृतिकची बाजू घेतली होती. हा फोटो खरा नसल्याचे सुजैनने स्पष्ट केले होते. हृतिकची अशी पाठराखण केल्यानंतर आज आता हृधानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना, हृतिक व सुजैन एकत्र आलेत...याचा आनंदच आहे... हृतिक व सुजैनचे आजचे फोटो ‘सीएनएक्स डिजिटल डॉट कॉम’च्या हाती लागलेत..तेव्हा तेही बघूयात!!
![]()
![]()