हृतिक आणि करणमध्ये बिनसलं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 12:27 IST2016-06-01T06:57:16+5:302016-06-01T12:27:16+5:30

अभिनेता हृतिक रोशन आणि करण जोहरमध्ये सध्या काही तरी बिनसलंय. कधीकाळी एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या हृतिक आणि करणच्या मैत्रीला ...

Hrithik and Karan? | हृतिक आणि करणमध्ये बिनसलं ?

हृतिक आणि करणमध्ये बिनसलं ?

िनेता हृतिक रोशन आणि करण जोहरमध्ये सध्या काही तरी बिनसलंय. कधीकाळी
एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या हृतिक आणि करणच्या मैत्रीला नजर लागली की काय
असं बोललं जातंय. कारण करणच्या आगामी 'कलंक' या सिनेमात काम करण्यास हृतिकनं
नकार दिलाय. हा सिनेमा स्वातंत्र्य चळवळीच्या बॅकड्रॉपवर आधारित या सिनेमात
हृतिकनं काम करावं अशी करणची इच्छा होती. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक बर्मन
करणार होते. मात्र हृतिकनं करणला साफ इन्कार केलाय. त्यानं करणचा सिनेमा
नाकारण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी 'शुद्धी' सिनेमासाठी करणची पहिली
पसंती हृतिकच होता. मात्र 'शुद्धी' सिनेमालाही हृतिकनं नकार दिला होता.

Web Title: Hrithik and Karan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.