​जाणून घ्या, प्रियांका कशी साजरी करणार दिवाळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 17:29 IST2016-10-27T17:29:46+5:302016-10-27T17:29:46+5:30

प्रियांका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये ‘क्वांटिको2’ या अमेरिकन टीव्ही शोच्या शूटींगमध्ये बिझी आहे. ही शूटींट आटोपताच प्रियांका भारतात परतणार आहे. ...

How do you celebrate Priyanka Diwali? | ​जाणून घ्या, प्रियांका कशी साजरी करणार दिवाळी?

​जाणून घ्या, प्रियांका कशी साजरी करणार दिवाळी?

रियांका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये ‘क्वांटिको2’ या अमेरिकन टीव्ही शोच्या शूटींगमध्ये बिझी आहे. ही शूटींट आटोपताच प्रियांका भारतात परतणार आहे. पण काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत तरी तिला न्यूयॉर्कमध्ये राहावे लागणार आहे. म्हणजे सध्या प्रियांका न्यूयॉर्कमध्ये आहे, म्हटल्यावर तिची यंदाची दिवाळीही तिथलीच. बिझी असल्याने प्रियांका यंदा दिवाळी साजरी करणार नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर ते मात्र चूक आहे. ती दिवाळी साजरी करणार आहे आणि तेही धूमधडाक्यात. होय, खुद्द प्रियांकानेच तिचा दिवाळी सेलिब्रेशन प्लॅन उघड केला आहे. twitterवर चाहत्यांशी गप्पा मारताना यंदाची दिवाळी ती कशी साजरी करणार, हे प्रियांकाने सांगितले. या वीकेन्डला काय प्लॅन आहे, असा प्रश्न एका चाहत्याने पीसीला केला. यावर एक क्षणही न  घालवता ‘दिवाली पार्टी फॉर माय फ्रेन्ड इन न्यूयॉर्क....’असे उत्तर प्रियांकाने दिले. या पार्टीत ती काय घालणार, हेही तिने सांगितले. मी भारतीय संस्कृतीशी मेळ खाणारा पोशाख परिधान करणार आहे, असे ती म्हणाली. निश्चितपणे प्रियांकाचा दिवाळी पार्टीतील लूक पाहण्यास तुम्ही आतूर असणारच.
गतवर्षीही प्रियांकाने न्यूयॉर्कमध्येच दिवाळी साजरी केली होती. ‘क्वांटिको’च्या टीमसोबत दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले होते.  




येत्या डिसेंबरमध्ये हॉलिवूड प्रोजेक्ट संपवून प्रियांका बॉलिवूडमध्ये धूमधडाक्यात पुनर्पदार्पण करणार, अशी चर्चा आहे. बॉलिवूडचे पीसीचे असंख्य चाहते तिच्या येण्याकडे डोळे लावून बसले आहेत. पीसी येईल तेव्हा येईलच. पण सध्या तरी  पीसीची दिवाळी पार्टीतला नवा लूक आपल्याला बघायला मिळणार आहे. शेवटी हेही नसे थोडके!!


 
 

Web Title: How do you celebrate Priyanka Diwali?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.