'तेरा सुरूर' साठी हिमेश रेशमियाचे सिक्स पॅक्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:05 IST2016-01-16T01:08:01+5:302016-02-10T11:05:08+5:30
'द एक्सपोज' नंतर हिमेश रेशमिया आता 'तेरा सुरूर २' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गायक, संगीतकार, निर्माता असलेला हिमेश ...

'तेरा सुरूर' साठी हिमेश रेशमियाचे सिक्स पॅक्स
' ;द एक्सपोज' नंतर हिमेश रेशमिया आता 'तेरा सुरूर २' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गायक, संगीतकार, निर्माता असलेला हिमेश आता सिक्स पॅक्ससह दिसणार आहे. यात नसिरूद्दीन शाह, शेखर कपूर, मोनिका दोगरा, कबीर बेदी, शेरनाझ पटेल हे मुख्य भूमिकेत असतील. फराह करिमी हिमेशसोबत दिसेल. शॉन आरान्हा दिग्दर्शित हा चित्रपट डब्लीन येथे शूट करण्यात आले. हिमेश चित्रपटाविषयी बोलताना म्हणाला,' शूटिंग आता पूर्ण झाली आहे. पोस्ट प्रोडक्शनचे काम हाती घेण्यात आले आहे. माझ्यातील बदलाविषयी विचाराल तर असे सांगेन की, खुप प्रमाणात हार्डवर्क केल्याने सिक्स पॅक्स तयार झाले आहेत.'