हिमेश रेशमिया या अभिनेत्रीसोबत अडकणार विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 14:52 IST2017-11-08T09:22:54+5:302017-11-08T14:52:54+5:30
हिमेश रेशमियाने आजवर अनेक हिट गाणी गायली असून अनेक चित्रपटांना खूप चांगले संगीत दिले आहे. हिमेशने नुकताच त्याची पत्नी ...
.jpg)
हिमेश रेशमिया या अभिनेत्रीसोबत अडकणार विवाहबंधनात
ह मेश रेशमियाने आजवर अनेक हिट गाणी गायली असून अनेक चित्रपटांना खूप चांगले संगीत दिले आहे. हिमेशने नुकताच त्याची पत्नी कोमलसोबत घटस्फोट घेतला. कोमल आणि त्याचे २२ वर्षांचे नाते त्याने संपवल्यामुळे सगळ्यांनाच शॉक बसला होता. पण हिमेश एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला असल्यामुळे त्याने कोमलला घटस्फोट दिला. ही अभिनेत्री म्हणजे सोनिया कपूर असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
सोनिया आणि हिमेश हे गेल्या अनेक वर्षांपासून नात्यात असून आता तर ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील राहात आहेत. हिमेशसोबत सध्या सोनियाला सतत पाहायला मिळते. त्याच्या लाइव्ह परफॉर्मन्सना देखील ती त्याच्यासोबत असते. आता ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. स्पॉटबॉय या वेबसाईटनुसार हिमेशच्या घरातल्यांना सोनिया खूपच आवडते. त्यामुळे तिने आणि हिमेशने लग्न करावे अशी त्यांची इच्छा आहे. हिमेश सध्या कामात व्यग्र असल्याने तो लग्नासाठी वेळ काढू शकत नाही. पण पुढील वर्षी तो लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाच्या दरम्यान हिमेशला लग्नासंदर्भात विचारण्यात आले होते. तू लवकरच दुसरं लग्न करण्याच्या तयारीत आहेस का? असे विचारले असता हिमेशने नाही असे उत्तर दिले होते. पण आता त्याने त्याचा निर्णय बदलला असल्याचे म्हटले जात आहे.
![himesh reshammiya sonia kapoor]()
२००६ मध्ये सर्वप्रथम हिमेश आणि सोनियाच्या अफेयरची चर्चा झाली होती. पण सोनिया ही केवळ त्याची चांगली मैत्रीण असल्याचेच तो त्याच्या घरातल्यांना आणि मीडियाला सांगत होता. पण मीडियात त्यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा सुरू झाल्यावर काही दिवस त्यांनी एकमेकांपासून दूर राहाणेच पसंत केले होते. मात्र हिमेशच्या वडिलांच्या निधनानंतर ते पुन्हा एकत्र आले.
नुकताच हिमेश सारेगमपा या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत आपल्याला पाहायला मिळाला होता. हिमेशने त्याच्या करिअरची सुरुवात सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्या चित्रपटातून केली होती. २००३ मध्ये हिमेश तेरे नाम या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे प्रकाशझोतात आला.
Also Read : हिमेश रेशमियाने सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील जयाशला केले साइन