​लैंगिक शोषण प्रकरणी जितेन्द्र यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 10:08 IST2018-03-18T04:32:45+5:302018-03-18T10:08:13+5:30

सुमारे ४७ वर्षे जुन्या लैंगिक शोषण प्रकरणी ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांना हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत, या ...

High court relief in sexual harassment case: Jitendra | ​लैंगिक शोषण प्रकरणी जितेन्द्र यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

​लैंगिक शोषण प्रकरणी जितेन्द्र यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

मारे ४७ वर्षे जुन्या लैंगिक शोषण प्रकरणी ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांना हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत, या प्रकरणाची पुढील कारवाई आणि चौकशीला स्थगिती दिली आहे. जितेन्द्र यांच्या चुलत बहिणीने त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. गत १६ फेब्रुवारीला पोलिसांनी याप्रकरणी जितेन्द्र यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. 
जितेन्द्र यांनी हा एफआयआर रद्द करण्याची मागणी करत, उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांनी कुठल्याही प्राथमिक चौकशी आणि पुराव्यांविना हा एफआयआर दाखल केल्याचा दावा जितेन्द्र यांनी केला होता. पोलिसांनी माझी कुठलीच चौकशी न करता, मला एफआयआरची कॉपी न देता गुन्हा दाखल केला. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेला हा कट आहे. ब्लॅकमेल करण्याच्या इराद्याने माझ्यावर आरोप केले जात आहेत. ही घटना ४७ वर्षांपूर्वीची आहे, असा दावा पीडितेने केला आहे. पण एफआयआरमध्ये या विलंबामागची कुठलीही कारणे नमूद नाहीत, असे जितेन्द्र यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते. एफआयआरमध्ये ना शिमल्याचे नाव आहे, ना हॉटेलचे. त्यामुळे सर्व आरोप खोटे आहेत, असा दावाही जितेन्द्र यांनी केला होता. आज जितेन्द्र यांच्या या याचिकेवर सुनावणी करताना, उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील कारवाईला आणि चौकशीला स्थगिती दिली. प्रकरणाची पुढील सुनावणी २३ मे रोजी होईल.

काय आहे प्रकरण
गत ७ फेबु्रवारीला हिमाचल डीजीपी आॅफिसला कथित पीडित महिलेने एक आॅनलाईन तक्रार पाठवली होती. यात तिने जितेन्द्र यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. ह्यही घटना  ४७ वर्षांपूवीर्ची आहे. त्यावेळी माझे वय १८ वर्ष होते. तर जितेंद्रचे वय २८ वर्ष होते. जानेवारी १९७१ मध्ये एकेदिवशी  माझा चुलत भाऊ जितेंद्र माज्या दिल्लीस्थित घरी आला.  तेथून शूटींग दाखवण्याच्या बहाण्याने तो मला कारने शिमला येथे  सेटवर घेऊन गेला. जितेंद्र माझा चुलत भाऊ असल्याने माज्या घरच्यांनीही सहज परवानगी दिली. शिमल्यात जितेंन्द्र  मला हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिथे त्याने नशेत माझे लैंगिक शौषण केले. या घटनेनंतर इतकी वर्षे केवळ माज्या आई वडिलांमुळे मी शांत होते. परंतु आई-वडिलांच्या निधनानंतर मी याविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला.  माज्या आई-वडिलांना  हयात असताना ही घटना समजली असती, तर त्यांना प्रचंड धक्का बसला असता. त्यामुळे मी  इतकी वर्षे प्रचंड मानसिक यातना सहन केल्या. पण  गेल्या काही दिवसांपासून जगभरात राबवल्या जात असलेल्या #MeToo या  अभियानाने मला धीर आला आणि मी याविरोधात आवाज उठवायचा निर्णय घेतला, असे या पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

ALSO READ : ४७ वर्षे जुन्या लैंगिक शोषणप्रकरणी अभिनेता जितेन्द्र यांच्याविरोधात एफआयआर

Web Title: High court relief in sexual harassment case: Jitendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.