​ ‘पद्मावती’च्या घाग-यावर भारी पडेल हेमा मालिनींच्या ‘या’ घाग-याचा किस्सा! नक्की वाचा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 15:29 IST2017-10-18T09:59:11+5:302017-10-18T15:29:11+5:30

दीपिका पादुकोण सध्या ‘पद्मावती’मुळे चर्चेत आहे. सध्या दीपिका जिथे कुठे जाईल,तिथे या चित्रपटाची गोष्ट निघतेच निघते. अलीकडे दीपिकाच्या हस्ते ...

Hema Malini's' The Fox '' will be heavy on Padmavati's fancy! Read exactly !! | ​ ‘पद्मावती’च्या घाग-यावर भारी पडेल हेमा मालिनींच्या ‘या’ घाग-याचा किस्सा! नक्की वाचा!!

​ ‘पद्मावती’च्या घाग-यावर भारी पडेल हेमा मालिनींच्या ‘या’ घाग-याचा किस्सा! नक्की वाचा!!

पिका पादुकोण सध्या ‘पद्मावती’मुळे चर्चेत आहे. सध्या दीपिका जिथे कुठे जाईल,तिथे या चित्रपटाची गोष्ट निघतेच निघते. अलीकडे दीपिकाच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन झाले. यावेळीही ‘पद्मावती’ची गोष्ट निघाली आणि मग ‘पद्मावती’बद्दल ऐकून हेमा मालिनी यांना आपल्या ‘रजिया सुल्तान’च्या दिवसांची आठवण झाली.



‘पद्मावती’मध्ये दीपिका राणी पद्मावतीची भूमिका साकारते आहे.चित्रपटातील तिचा लूक सगळ्यांनाच मोहित करून गेला आहे. २० किलोंचे दागिने आणि तेवढाच वजनदार  घागरा अंगावर चढवून दीपिका या अख्ख्या चित्रपटात वावरताना दिसणार आहे.  दीपिकाच्या या  घाग-याचे वजन ११ किलो होते. तर यासोबतच्या ओढणीचे वजन ४ किलो होते. पण हेमाच्या जीवनचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात दीपिकाच्या घाग-याच्या निमित्ताने एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली. ती म्हणजे, दीपिकाच्या घाग-यापेक्षा हेमांच्या चित्रपटांतील कपड्यांची कथा अधिक रोचक आहे. हेमा मालिनी यांनी स्वत:च ती सर्वांना ऐकवली.



‘दीपिकाचा ‘पद्मावती’ दोन वर्षांत पूर्ण झाला. पण माझा ‘रजिया सुल्तान’ हा ऐतिहासिक चित्रपट तयार व्हायला आठ वर्षे लागली होती. कारण त्यावेळी चित्रपटांसाठी इतका मोठा बजेट नसायचा. ‘रजिया सुल्तान’ करत असतानाच मी ‘मीरा’ या चित्रपटातही काम करत होते. तो सुद्धा एक ऐतिहासिक चित्रपट होता. पण ‘मीरा’च्या निर्मात्यांकडे तर काहीच बजेटचं नव्हता. मला आठवतं, त्या चित्रपटासाठी केवळ एक घागरा शिवला गेला होता. चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्या घाग-याचा केवळ रंग बदलला गेला आणि लोकांना प्रत्येकवेळी मी नव्या घाग-यात दिसले,’ अशी एक आठवण हेमांनी यावेळी ऐकवली. हेमा मालिनींचा शेवटचे हे वाक्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पण सरतेशेवटी  हेमांचा हाच घागरा दीपिकाच्या ‘पद्मावती’वर भारी पडला. कारण कार्यक्रम संपल्यानंतरही हेमांच्या याच एका घाग-याची चर्चा रंगली.

ALSO READ: ‘पद्मावती’च्या कलाकारांनी घेतली तगडी फी! जाणून घ्या किती?

 नुकताच संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘पद्मावती’चा ट्रेलरही रिलीज झाला. भव्यदिव्य असा सिनेमाचा ट्रेलरही रसिकांना चांगलाच भावला.  पहिल्या २४ तासांत  या चित्रपटाने १.५ कोटी व्ह्युज मिळवले. युट्यूबवर  ‘पद्मावती’चा ट्रेलर २ कोटींवर युजर्सनी पाहिला.  

Web Title: Hema Malini's' The Fox '' will be heavy on Padmavati's fancy! Read exactly !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.