या कारणामुळे हॅझेल कीच आहे सोशल मीडियापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 05:56 PM2019-04-02T17:56:23+5:302019-04-02T17:57:30+5:30

हॅझेल कीचने सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून कोणतीच पोस्ट टाकलेली नाहीये. त्यामुळे हॅझेल कुठे आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. हॅझेलनेच आता सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून ती कुठे गायब होती हे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.

Hazel Keech undergoes a nose surgery, reveals on Social Media | या कारणामुळे हॅझेल कीच आहे सोशल मीडियापासून दूर

या कारणामुळे हॅझेल कीच आहे सोशल मीडियापासून दूर

ठळक मुद्देमाझे नाकाचे ऑपरेशन झाल्यामुळे कित्येक दिवसांपासून मी आराम करत आहे. मला व्यायाम करण्याची देखील परवानगी नाहीये आणि त्यामुळे माझे चांगलेच वजन वाढले आहे. त्याचमुळे मी गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. 

अभिनेत्री हॅझेस कीच खूपच कमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. कधीतरी ती तिचे खाजगी जीवनातील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना दिसते. तिने काही दिवसांपूर्वी टेन इयर चॅलेंजचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर तिने सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट टाकली नव्हती. त्यामुळे हॅझेल कुठे आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. हॅझेलने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून ती कुठे गायब होती हे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून तिची नुकतीच नाकाची सर्जरी झाल्याचे या पोस्टद्वारे सांगितले आहे.

बॉडीगार्ड या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या हॅझेली कीचचे नुकतेच नाकाचे ऑपरेशन झाले असून या ऑपरेशननंतर तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या सासूबाईंचे आभार मानले आहेत. तिने पोस्टमध्ये त्यांच्यासाठी एक भावुक संदेश लिहिला आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलेले नाहीये. त्यामुळे मी कुठे गायब झाली हा प्रश्न माझ्या चाहत्यांना नक्कीच पडला असणार... मला श्वासोच्छवास करायला त्रास होत होता. त्यामुळे मला एका महिन्यांपूर्वी नाकाची सर्जरी करावी लागली. मला श्वासोच्छवासाचा त्रास अनेक वर्षांपासून आहे आणि त्याचा मला त्रास देखील होतो. पण याकडे मी दुर्लक्ष केले होते. पण नुकत्याच माझ्या सासूबाई मला रुग्णायलात घेऊन गेल्या आणि तिथे गेल्यावर आम्हाला कळले की, माझ्या नाकाचे लगेचच ऑपरेशन करावे लागेल. पण आता ऑपरेशननंतर मला श्वासोच्छवास करायला थोडा देखील त्रास होत नाहीये. मी या ऑपरेशनमुळे कित्येक दिवसांपासून आराम करत आहे. मला व्यायाम करण्याची देखील परवानगी नाहीये आणि त्यामुळे माझे चांगलेच वजन वाढले आहे. त्याचमुळे मी गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. 

अभिनेत्री हॅजेल कीच ही प्रसिद्ध क्रिकेटर युवराज सिंगची पत्नी आहे. युवराज आणि हॅजेल यांनी अनेक वर्षांच्या नात्यानंतर लग्न केले. युवराज सध्या आयपीएलमध्ये व्यग्र असून तो मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आहे. 

Web Title: Hazel Keech undergoes a nose surgery, reveals on Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.