सॅल्युट!  लोकांना ‘श्वास’ मिळावा म्हणून हर्षवर्धन राणेनं खरंच आवडती रॉयल एनफिल्ड विकली...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 04:03 PM2021-05-06T16:03:37+5:302021-05-06T16:06:15+5:30

Harshvardhan Rane : लोकांना आधी हा पब्लिसिटी स्टंट वाटला, पण हर्षवर्धनने खरोखर बाईक विकली आणि त्या पैशातून...

harshvardhan rane sold his bike to help covid 19 patients | सॅल्युट!  लोकांना ‘श्वास’ मिळावा म्हणून हर्षवर्धन राणेनं खरंच आवडती रॉयल एनफिल्ड विकली...!!

सॅल्युट!  लोकांना ‘श्वास’ मिळावा म्हणून हर्षवर्धन राणेनं खरंच आवडती रॉयल एनफिल्ड विकली...!!

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्यावर्षी करोनाची पहिली लाट आली होती तेव्हा हर्षवर्धनला करोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्याच्यावर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

देशात कोरोनाची भीषण स्थिती आहे. एकीकडे देशात रोज लाखो नवे कोरोना रूग्ण सापडत आहेत. दुसरीकडे ऑक्सिजन  व बेड्सचा प्रचंड तुटवडा भासतो आहे. लोक हतबल आहेत. ही स्थिती पाहून तो हवालदिल झाला. गरजू लोकांच्या मदतीसाठी काय तर त्याने आपली आवडती बाईक विकायला काढली. सोशल मीडियावर या बाईकच्या विक्रीसाठी त्याने जाहिरात केली. आधी लोकांना हा पब्लिसिटी स्टंट वाटला. पण त्याने खरोखर बाईक विकली आणि या पैशातून काय घेतले तर ऑक्सिजन कंन्सट्रेटर. हा कोण तर अभिनेता हर्षवर्धन राणे. (Harshvardhan Rane )

बाईक विकल्याची माहिती हर्षवर्धनने स्वत: इन्स्टास्टोरीवर दिली आहे. बाईक विकल्या गेली. 3 ऑक्सिजन कंन्सट्रेटर हैदराबादला पोहोचत आहेत. आणखी काही पोहोचण्याची अपेक्षा आहे, असे त्याने लिहिले. (Harshvardhan Rane sold his bike to help covid 19 patients)
काही दिवसांपूर्वी हर्षवर्धनने इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो आपल्या आवडत्या बाईकसोबत दिसला होता. ‘माझी ही बाईक विकायला मी तयार आहे.त्या पैशांतून मी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर विकत घेऊन ज्यांना गरज आहे त्यांना मदत करीन...हैदराबादमध्ये मला चांगल्या गुणवत्तेचे आॅक्सिजन कॉन्सेंट्रेटर हवे आहेत...,’ असे त्याने हा फोटो शेअर करताना लिहिले होते.

हर्षवर्धनचे बाईक प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. अशात आपली आवडती बाईक लोकांच्या मदतीसाठी विकाणे यासाठी मोठा जिगरा लागतो. त्यामुळे युजर्सनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 
 सनम तेरी कसम या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे बरेच कौतुक झाले होते. यानंतर  पलटन या चित्रपटात तो झळकला. अर्थात बॉलिवूडमध्ये त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
गेल्यावर्षी करोनाची पहिली लाट आली होती तेव्हा हर्षवर्धनला करोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्याच्यावर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

Web Title: harshvardhan rane sold his bike to help covid 19 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.