हर्षवर्धनने उघड केला सोनमचा ढोंगीपणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 20:03 IST2016-09-20T14:09:16+5:302016-09-20T20:03:08+5:30
हर्षवर्धन कपूर आणि सोनम कपूर या बहिण-भावांचे नाते एकदम मित्र-मैत्रिणीसारखे आहे. त्यामुळे एकमेकांचे गुण-दोष सांगायला दोघेही मागेपुढे पाहत नाही. ...

हर्षवर्धनने उघड केला सोनमचा ढोंगीपणा!
ह ्षवर्धन कपूर आणि सोनम कपूर या बहिण-भावांचे नाते एकदम मित्र-मैत्रिणीसारखे आहे. त्यामुळे एकमेकांचे गुण-दोष सांगायला दोघेही मागेपुढे पाहत नाही. यावेळी तर हर्षवर्धनने सोनमला चक्क ‘ढोंगी’ म्हटले. आता ते कशासाठी तर सोनमच्या एका निर्णयासाठी. होय, सोनमचे पहिले प्रेम हे बॉलिवूडमधील होते. सर्वात आधी सोनम तिचा ‘आॅनस्क्रीन सावरियां’ रणबीर कपूरच्या प्रेमात पडली होती. मात्र कालांतराने सावरियां दुसºयाच कुणावर भाळला आणि सोनम एकटी पडली. तेव्हापासून बॉलिवूडशी संबंधित कुणालाही डेट न करण्याचा निर्णय सोनमने घेतला. सोनमचा हाच निर्णय हर्षवर्धनला ‘ढोंगीपणा’ वाटतो. हर्षवर्धनच्या मते, सोनमचा हा निर्णय त्याला जराही पटलेला नाही. कुण्याही बॉलिवूडमधील व्यक्तिला डेट करणार नाही,असे सोनम म्हणत असेल तर तो तिचा ढोंगीपणा आहे, असे हर्षवर्धनला वाटते. आता भावाच्या म्हणण्यानुसार हा ‘ढोंगीपणा’ सोनम कधी सोडणार, हे तिचे तिलाच ठाऊक!
![]()