प्रियंका चोप्राचा एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नाची पार्टी सुरु, पाहा त्याच्या होणार पत्नीसोबतचा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 06:09 PM2021-03-20T18:09:07+5:302021-03-20T18:13:09+5:30

त्याच्या कॉकटेल पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

Harman baweja is getting married to sasha ramchandan | प्रियंका चोप्राचा एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नाची पार्टी सुरु, पाहा त्याच्या होणार पत्नीसोबतचा खास फोटो

प्रियंका चोप्राचा एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नाची पार्टी सुरु, पाहा त्याच्या होणार पत्नीसोबतचा खास फोटो

googlenewsNext

अभिनेता हरमन बावेजा साशा रामचंदानीसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. त्याच्या कॉकटेल पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने पार्टीमधील अनेक फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहेत. इंस्टाग्राम स्टोरीजवर राजने एक ग्रुप फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये हरमन आपल्या मित्रांसह पोज देताना दिसतोय. या फोटोत बी-टाऊनमधले अनेक चेहरे दिसतायेत. हरमन एका व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसतोय. 


हरमन दिग्दर्शक-निर्माता हॅरी बावेजा यांचा मुलगा आहे.  2008 मध्ये वडिलांनी दिग्दर्शित ‘लव्ह स्टोरी २०5०’ मधून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.हरमन आणि प्रियंकाची मैत्री 2008मध्ये 'लव्ह स्टोरी २०५०’च्या सेटवर झाली होती. प्रियंकासोबत त्याची मैत्री चांगलीच बहरली. पुढे दोघेही एकमेकांच्या प्रेमातही पडले. अर्थात ‘वॉट्स यॉर राशी’ या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी दोघांचेही ब्रेकअप झाले.  हरमन बावेजा त्याच्या अ‍ॅक्टिंगपेक्षा हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रिय झाला होता.त्याचा हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण लुक्स आणि हॉट बॉडी यामुळे हरमनची त्यावेळी बरीच क्रेझ होती. अर्थात हळूहळू ही क्रेझ ओसरली आणि हरमन बॉलिवूडमधून गायब झाला. 


हेल्थ कोच साशा रामचंदानीसोबत हरमनने 2020मध्ये साखरपुडा केला. हरमनची बहीण रोवेनाने सोशल मीडियावर दोघांच्या रोका सेरेमनीचा फोटो शेअर केले होते. 

Web Title: Harman baweja is getting married to sasha ramchandan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.