​‘हरियाणवी छोरी’ मनुषी चिल्लरने जिंकला फेमिना मिस इंडिया 2017 चा ताज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2017 13:49 IST2017-06-26T08:19:03+5:302017-06-26T13:49:03+5:30

हरियाणाची मनुषी चिल्लर हिने यंदाचा ‘फेमिना मिस इंडिया2017’ किताब पटकावला आहे. मुंबईतील यशराज स्टुडिओत काल रंगलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ...

'Hariyanvi Chori' Mani Chillar wins Femina Miss India 2017 crown! | ​‘हरियाणवी छोरी’ मनुषी चिल्लरने जिंकला फेमिना मिस इंडिया 2017 चा ताज!

​‘हरियाणवी छोरी’ मनुषी चिल्लरने जिंकला फेमिना मिस इंडिया 2017 चा ताज!

ियाणाची मनुषी चिल्लर हिने यंदाचा ‘फेमिना मिस इंडिया2017’ किताब पटकावला आहे. मुंबईतील यशराज स्टुडिओत काल रंगलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात मनुषीने या किताबावर आपले नाव कोरले. गत वर्षीची मिस इंडिया प्रियदर्शनी चॅटर्जी हिने मनुषीच्या डोक्यावर विजयी मुकुट चढवला. 
जम्मू-काश्मीरमधील सना दुआ ही या स्पर्धेतील दुसरी रनरअप ठरली तर बिहारची प्रियांका कुमारी हिने तिसरा क्रमांक पटकावला. 
मनुषी ही मेडिकलची विद्यार्थीनी आहे. याचदरम्यान ती मॉडेलिंगकडे आकर्षित झाली. तिने याआधी ‘मिस हरयाणा’चाही किताब पटकावला आहे. मनुषीने यंदाचा मिस फोटोजेनिक अ‍ॅवॉर्डही जिंकला आहे. येत्या डिसेंबरमध्ये चीनमध्ये होणाºया मिस वर्ल्ड २०१७ स्पर्धेत मनुषी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या विजयानंतर हरियाणात आनंदाचे वातावरण आहे.
आपल्या प्रवासाबद्दल विचारले असता, मी जग बदलू शकते, असे ती म्हणाली. मी जग बदलू शकते, याच एका व्हिजनसह  स्पर्धेच्या या ३० दिवसांत  मी पुढे गेले. मी कमालीची सकारात्मक आहे. या एका सकारात्मक दृष्टिकोनासह अख्खे जग बदलता येऊ शकते. माझा यावर विश्वास आहे,असे तिने सांगितले.
रितेश देशमुख आणि करण जोहर या दोघांनी मिस इंडिया सोहळा होस्ट केला. यावेळी रणबीर कपूरने शानदार परफॉर्मन्स दिला. या स्पर्धेच्या जज पॅनलमध्ये अर्जुन रामपाल, अभिषेक कपूर, इलियाना डिक्रूज, विद्युत जामवाल व बिपाशा बसू होते. याशिवाय मनीष मल्होत्रा आणिस्टेफिनी डेल वेल (े्र२२ ढ४ी१३ङ्म फ्रूङ्म) यांचाही समावेश होता. मनुषीच्या पुढील प्रवासासाठी आपण तिला शुभेच्छा देऊ यात. तुमच्या शुभेच्छा तुम्ही खालील कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता.

Web Title: 'Hariyanvi Chori' Mani Chillar wins Femina Miss India 2017 crown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.