​हरभजन सिंग-गीता बसराने केली मुलीसोबत पहिली लोहरी सेलिब्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 11:25 IST2017-01-14T11:25:21+5:302017-01-14T11:25:21+5:30

भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग आणि त्याची पत्नी व बॉलीवूड अभिनेत्री गीता बसराच्या संसारामध्ये मुलीच्या आगमनाने आनंदच आनंद आहे. त्यांची ...

Harbhajan Singh-Geeta celebrates the first lohri celebrity with the girl | ​हरभजन सिंग-गीता बसराने केली मुलीसोबत पहिली लोहरी सेलिब्रेट

​हरभजन सिंग-गीता बसराने केली मुलीसोबत पहिली लोहरी सेलिब्रेट

रतीय क्रिकेटर हरभजन सिंग आणि त्याची पत्नी व बॉलीवूड अभिनेत्री गीता बसराच्या संसारामध्ये मुलीच्या आगमनाने आनंदच आनंद आहे. त्यांची मुलगी हिनाया हीरची यंदा पहिली ‘लोहरी’ आहे. पंजाबमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुलीच्या पहिल्या-वहिल्या ‘लोहरी’साठी नुकतेच पालक बनलेल्या हरभजन-गीताने जोरदार तयारी केली होती.

सोशल मीडिया सार्ईट इन्स्टाग्रामवर त्यांनी मुलीसोबतचा झक्कास सेल्फी शेअर करून तिला या पवित्र सणाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोत क्युट हिनाया तिची आई गीताच्या मांडीवर बसेलेली आहेत तर पापा हरभजनने हा सेल्फी क्लिक केला आहे. यावेळी त्याने टोपी घातलेली दिसते. आतापर्यंत या फोटोला हजारो  लोकांनी लाईक केले असून कमेंट करूनही त्यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
फोटो शेअर करताना गीताने कॅप्शन दिले की, ‘आमचे जीवनच बनून गेलेल्या मुलीला तिच्या पहिल्या लोहरीच्या खूप खूप शुभेच्छा. तु आमच्या हृदयाचे स्पंदन आहेस. देव तुझे सदैव रक्षण करो आणि तुला कशाचीही कमी ना राहो, अशी आम्ही कामना करतो’.

                                      Harbhajan and Geeta with dughter

हरभजन आणि गीताने गेल्या वर्षी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले होते. सुमारे पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. एका गुरुद्वाऱ्यात त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेतेमंडळी, क्रिकेटर्स व व्यवसायिकांनी हजेरी लावली होती.

गेल्या महिन्यातच गीताच्या ‘बेबी शॉवर’च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलीचा जन्म झाल्याचे कळताच हरभजन लगेच पत्नीपाशी लंडनला गेला होता. गीताने ‘दिल दिया है’ (२००६) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘द ट्रेन’ आणि ‘सेकंड हसबंड’ या चित्रपटांतूनही दिसली होती.

Web Title: Harbhajan Singh-Geeta celebrates the first lohri celebrity with the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.