Happy Wedding Anniversary : अशी आहे ऐश्वर्या व अभिषेक बच्चनची लव्हस्टोरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 10:31 IST2017-04-20T05:01:12+5:302017-04-20T10:31:12+5:30
अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन या दोघांच्या लग्नाचा आज(२० एप्रिल) दहावा वाढदिवस. ऐश्वर्याच्या वडिलांचे अलीकडेच निधन झाले. त्यामुळे ...

Happy Wedding Anniversary : अशी आहे ऐश्वर्या व अभिषेक बच्चनची लव्हस्टोरी...
अ िषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन या दोघांच्या लग्नाचा आज(२० एप्रिल) दहावा वाढदिवस. ऐश्वर्याच्या वडिलांचे अलीकडेच निधन झाले. त्यामुळे ऐश्वर्या व अभिषेकने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ख-या प्रेमाला सेलिब्रेशनची गरज काय? ऐश व अभिबद्दलही असेच म्हणता येईल. या दोघांची प्रेमकहानी अनेकार्थाने अनोखी आहे. आज ऐश व अभिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ यात, या दोघांची खास लव्ह-स्टोरी...
पहिली भेट
![]()
ऐश्वर्या व अभिषेकची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. येथे अभिषेक अमिताभ यांच्या ‘मृत्युदाता’ या चित्रपटाचे शूटींग पाहायला गेला होता. स्वित्झर्लंडमध्ये याचदरम्यान ऐश्वर्या तिच्या ‘और प्यार हो गया’ या पहिल्या चित्रपटाचे शूटींग करत होती. या चित्रपटात ऐश्वर्याच्या अपोझिट होता बॉबी देओल. बॉबी हा अभिषेकचा चांगला मित्र आहे. बॉबीने अभिषेकला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. याचठिकाणी अभिषेक ऐश्वर्याला पहिल्यांदा भेटला होता.
![]()
अशी झाली होती नजरा-नजर
ऐश्वर्या व अभिषेक बच्चन या दोघांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले. यानंतर ‘बंटी और बबली’या चित्रपटातील ‘कजरा रे’ या गाण्याचे शूटींग सुरु असतानाच दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुलला. लगेच दोघे ‘उमराव जान’मध्ये दिसले. या चित्रपटाच्या सेटवरच ऐश्वर्या व अभिषेक एकमेकांच्या जवळ आलेत. ‘गुरु’च्या सेटवर मात्र दोघांचे प्रेम चांगलेच बहरले. एका मुलाखतीत अभिषेकने सांगितले होते की, मी आणि ऐश्वर्या ‘गुरु’च्या शूटींगसाठी न्यूयॉर्कमध्ये होतो आणि त्याचवेळी येथील हॉटेलच्या बाल्कनीत उभा राहून मी ऐश्वर्याबद्दल विचार करत होतो. ऐश्वर्यासोबत लग्न केल्यानंतर आयुष्य किती आनंदी असेल, असा विचार माझ्या मनात सुरु होता. यानंतर टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये ‘गुरु’च्या प्रीमिअरदरम्यान आम्ही न्यूयॉर्कच्या त्याच हॉटेलात थांबलो होतो. मी ऐश्वर्याला त्याच बाल्कनीत घेऊन गेलो आणि तिला प्रपोज केले.
![]()
फिल्मी स्टाईलने केले होते प्रपोज
अभिषेकने ऐश्वर्याला अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज केले होते. ऐश्वर्याने याबद्दल सांगितले होते. अभिषेक खरा आहे. आमचे नाते जितके खरे आहे, तितकेच अभिषेकही सच्चा आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. परस्परांची काळजी घेतो, असे ती म्हणाली होती. २००७ मध्ये ऐश व अभिचा साखरपुडा झाला आणि याचवर्षी २० एप्रिलला दोघे लग्नबंधनात अडकले. या दोघांच्या सुंदर आयुष्यात आता आराध्या नावाची चिमुकली परी अवतरली आहे. हे नाते असे सुंदर राहो, अशा शुभेच्छा ऐश्वर्या व अभिषेकला देऊ यात!