‘रॉक आॅन’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 19:35 IST2016-11-09T19:35:39+5:302016-11-09T19:35:39+5:30
केंद्र सरकारने 500 व 1000 च्या चलनावर बंदी आणली असल्याने देशभरात मोठी खळबळ माजली आहे. लोकांनी आपले व्यवहार कसे ...

‘रॉक आॅन’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
फरहानचा रॉक आन 2 हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. याच वेळी 500 व 1000 रुपयांचे नोट रद्दबातल ठरल्याने या चित्रपटाला मोठा फटका बसू शकतो असे फरहान अख्तरला वाटू लागलेय. याचमुळे सामान्य मानसाच्या मनोरंजनावर याचा परिणाम होऊ नये यासाठी पीव्हीआर सिनेमाजच्या वतीने रॉक आन 2च्या तिकिटा डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणझे अशा पद्धतीने तिकिटाची खरेदी करताना लागणारी कविनियेंस फी घेतली जाणार नाही. ही सूट पीव्हीआरच्या वेबसाईट किंवा अॅपच्या माध्यमातून केल्या जाणाºया खरेदीवर दिली जाणार आहे.
ही माहिती पीव्हीआरने जारी केल्यावर फरहान अख्तरने ट्विट करून पीव्हीआरचे आभार मानले आहेत. याबाबतचे ट्विट करून त्याने ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. बुधवारी व गुुरुवारी बॅक व एटीएम मशिन्स बंद राहणार असल्याने नागरिकांना असुविधेचा सामाना करावा लागतो आहे. शिवाय रॉक आॅन 2च्या सुरुवातीच्या दिवसांच्या कलेक्शनवर याचा परिणाम दिसू शकत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पीव्हीआरने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येते. पीव्हीआरचा हा उपक्रम कौतुकास्पद असून लवकरच अन्य एन्टरटेनमेंटचेन मधील सिनेमागृह देखील अशीच व्यवस्था करू शकतात.
Now here's some good news .. please RT. #RockOn2#2DaysToGo#nov11pic.twitter.com/q3tXPCSYUp— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) November 9, 2016 ">http://
}}}}Now here's some good news .. please RT. #RockOn2#2DaysToGo#nov11pic.twitter.com/q3tXPCSYUp— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) November 9, 2016