कमल हासनने दिल्या श्रुती हसनला वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 16:18 IST2017-01-28T10:48:58+5:302017-01-28T16:18:58+5:30
कमल हासनची मोठी मुलगी श्रुतीने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये आपले चांगले बस्तान बसवले आहे. तिने लक, वेलकम बॅक यांसारख्या हिंदी चित्रपटातही ...

कमल हासनने दिल्या श्रुती हसनला वाढदिवसाच्या शुभेच्छा
क ल हासनची मोठी मुलगी श्रुतीने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये आपले चांगले बस्तान बसवले आहे. तिने लक, वेलकम बॅक यांसारख्या हिंदी चित्रपटातही काम केले आहे.
आज श्रुतीचा वाढदिवस असून तिने वयाची तिशी पूर्ण केली आहे. या खास दिवशी तिच्या वडिलांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे. आतापर्यंत तू खूप चांगली प्रगती केली आहेस. पण ही केवळ एक सुरुवात आहे असे म्हणत कमल हासनने श्रुतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कमल हासनने श्रुतीला शुभेच्छा देण्यासाठी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने म्हटले आहे की, श्रुती तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तू तुझे काम खूप चांगल्याप्रकारे करत आहेस. पण लक्षात ठेव ही केवळ एक सुरुवात आहे. तुझे वडील नेहमीच तुझ्यासोबत असणार आहेत.
श्रुती गेल्या कित्येक दिवसांपासूनच तिच्या वाढदिवसासाठी खूप उत्सुक आहे. तिने कालच एक ट्वीट करून तिचा वाढदिवस ती कुटुंबियांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत सेलिब्रेट करणार असल्याचे म्हटले होते. तिने ट्वीटमध्ये म्हटले होते की, माझ्या वाढदिवसासाठी मी चेन्नईला चालली आहे.
श्रुती ही कमल हासन आणि अभिनेत्री सारिकाची मोठी मुलगी आहे. कमल हासन यांचे पहिले लग्न दाक्षिणात्य अभिनेत्री वाणी गणपतीसोबत झाले होते. लग्नाच्या काहीच वर्षांत त्यांच्यात भांडणे होऊ लागली. कारण कमल हासनच्या आयुष्यात वाणीची जागा सारिकाने घेतली होती. वाणीशी घटस्फोट न घेता कमल सारिकासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. त्यांच्या पहिल्या मुलीचा म्हणजेच श्रुतीचा जन्म झाला, त्यावेळी सारिका आणि कमलचे लग्न झालेले नव्हते. श्रुतीच्या जन्मानंतर कमलने वाणीला घटस्फोट दिला आणि सारिकासोबत लग्न केले.