happy birthday KSG: ​बिपाशा बसूने हबी करण सिंह ग्रोवरला दिले ‘बिग सरप्राईज’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 13:23 IST2017-02-23T06:59:00+5:302017-02-23T13:23:39+5:30

बिपाशा बसूचा लाडका हबी करण सिंह ग्रोवर याचा आज (२३ फेबु्रवारी) वाढदिवस. करणच्या वाढदिवसाची प्री-पार्टी कशी रंगली होती, ते तुम्ही बघितलेच. यानंतर काल रात्री बाराच्या ठोक्यालाही बिपाशाने करणसाठी खास सरप्राईज बर्थ डे पार्टी प्लान केली होती.

Happy Birthday KSG: Bipasha Basu gave 'Habib Karpai' to Hari Karan Singh Grover! | happy birthday KSG: ​बिपाशा बसूने हबी करण सिंह ग्रोवरला दिले ‘बिग सरप्राईज’!

happy birthday KSG: ​बिपाशा बसूने हबी करण सिंह ग्रोवरला दिले ‘बिग सरप्राईज’!

पाशा बसूचा लाडका हबी करण सिंह ग्रोवर याचा आज (२३ फेबु्रवारी) वाढदिवस. करणच्या वाढदिवसाची प्री-पार्टी कशी रंगली होती, ते तुम्ही बघितलेच. यानंतर काल रात्री बाराच्या ठोक्यालाही बिपाशाने करणसाठी खास सरप्राईज बर्थ डे पार्टी प्लान केली होती. 
होय, करणच्या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी बिपाशा आपल्या  गँगसोबत गोव्यात पोहोचली.  या गँगमध्ये बिपाशा व करण दोघांच्याही जवळच्या मित्रांचा समावेश होता. या पार्टीतले सगळ्यात मोठे सरप्राईज काय होते, तर सगळेजण करणचा फोटो असलेले टी-शर्ट घालून आले होते. म्हणजे सगळी पार्टी ‘करण थीम’वर अरेंज करण्यात आली होती. करणसाठी हे मोठ्ठे सरप्राईज होते. बिपाशाने सुद्धा करणचा फोटो असलेले टी-शर्ट घातले होते. या पार्टीतले काही फोटो, बिपाशाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात बिपाशा व करण प्रचंड आनंदी दिसत आहेत. एकंदर काय तर करणचा बर्थ डे स्पेशल बनवण्यात बिपाशाने कुठलीच कसर सोडली नाही. साहजिक करणने इतकी शानदार बर्थ डे पार्टी कधीच एन्जॉय केली नसेल.
 











बर्थ डेच्या आदल्या रात्री करणची प्री-बर्थ डे पार्टीही अशीच मस्त रंगली होती. या पार्टीत बिपाशा, करण आणि त्यांची गँग सगळेच धम्माल मस्ती करताना दिसले होते. या प्री-बर्थ डे पार्टीतील केकही एकदम स्पेशल होता. त्यात योगा करतानाची एक डमी उभारलेली होती.
गतवर्षी ३० एप्रिलला करण व बिपाशा दोघेही लग्नबंधनात अडकले होते. सन २०१४ मध्ये ‘अलोन’ या चित्रपटाच्या सेटवर बिपाशा व करण यांचे प्रेम फुलले होते. 

ALSO READ : करण सिंह ग्रोवरच्या प्री-बर्थ डे पार्टीचे फोटो पाहाच!

Web Title: Happy Birthday KSG: Bipasha Basu gave 'Habib Karpai' to Hari Karan Singh Grover!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.