Happy Birthday Freddy : ​फ्रेडी दारूवालाला आहे ‘हा’ महागडा शौक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 12:20 IST2017-05-12T06:50:13+5:302017-05-12T12:20:13+5:30

अभिनेता फ्रेडी दारूवाला याचा आज (१२ मे) वाढदिवस. अक्षय कुमार स्टारर ‘हॉलिडे : अ सोल्जर इस नेवर आॅफ ड्युटी’मध्ये ...

Happy Birthday Freddy: Freddie Daruwalla has 'Ha' expensive hobby! | Happy Birthday Freddy : ​फ्रेडी दारूवालाला आहे ‘हा’ महागडा शौक!

Happy Birthday Freddy : ​फ्रेडी दारूवालाला आहे ‘हा’ महागडा शौक!

िनेता फ्रेडी दारूवाला याचा आज (१२ मे) वाढदिवस. अक्षय कुमार स्टारर ‘हॉलिडे : अ सोल्जर इस नेवर आॅफ ड्युटी’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत बॉलिवूड डेब्यू करणारा  फ्रेडी याने आज स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.  सध्या फ्रेडीने आपले संपूर्ण लक्ष बॉलिवूडवर केंद्रीत केले आहे. लवकच त्याचा ‘उम्मीद’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ यात, त्याच्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी....
 फ्रेडी एक पारशी आहे. सूरतच्या राहणाºया  फ्रेडीला अभिनेता बनायचे होते आणि याच ध्यासाने त्याने मुंबई गाठली.



बॉलिवूडमध्ये येण्याआधी  फ्रेडीने थिएटर गाजवले. एमबीएची डिग्री घेतल्यानंतर फ्रेडीने सर्वप्रथम मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावयचे ठरवले. विशेष म्हणजे, नशीबाने त्याला चांगली साथ दिली. बॉलिवूडमध्ये येण्याआधी फ्रेडी मॉडेलिंग आणि टीव्ही कमर्शिअरचा एक चमकता तारा बनला होता.  



फ्रेडीने एका पंजाबी सिनेमापासून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘मम्मी’ या पंजाबी चित्रपटात तो सर्वप्रथम दिसला. यानंतर त्याच्या वाट्याला ‘हॉलिडे : अ सोल्जर इस नेवर आॅफ ड्युटी’ हा बॉलिवूडपट आला. यात फ्रेडीने खलनायक साकारला. या पहिल्यावहिल्या बॉलिवूडपटातील फ्रेडीचा अभिनय सगळ्यांना अवाक करणारा होता.



खरे तर अक्षय कुमारसोबत ‘हॉलिडे : अ सोल्जर इस नेवर आॅफ ड्युटी’ हा सिनेमा करण्यापूर्वी फ्रेडीने संजय दत्तसोबत ‘शेर’ नावाचा सिनेमा केला होता. पण दुर्दैवाने हा सिनेमा रिलीजच झाला नाही.



अभिनयाशिवाय फ्रेडीला एका गोष्टीची प्रचंड आवड आहे. ती म्हणजे, महागडे मनगटी घड्याळ आणि जोडयांचा. होय,फ्रेडीचे मानाल तर पुरूषाची खरी ओळख त्याचे मनगटी घड्याळ आणि त्याच्या जोड्यांवरूनच केली जाते.



फ्रेडीकडे ११ अतिशय महागड्या घड्याळी आहेत. याप्रत्येक घड्याळीमागे एक कहाणी आहे. या घड्याळी त्याने खूप विचारपूर्वक खरेदी केल्या आहेत. खरे तर लहानपणापासूनच फ्रेडीला मनगटावर महागडी घड्याळ मिरवायला आवडायचे. पण मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टिंग सुरु केल्यावर म्हणजेच खिशात पैसा खुळखुळू लागल्यावर त्याने आपला हा शौक पूर्ण करणे सुरु केले.

Web Title: Happy Birthday Freddy: Freddie Daruwalla has 'Ha' expensive hobby!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.