​Happy Birth Day Sussanne: अशी साजरी झाली हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खानची बर्थ डे पार्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 12:15 IST2017-10-26T06:45:34+5:302017-10-26T12:15:34+5:30

हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान हिचा आज (२६ आॅक्टोबर) वाढदिवस. पण या वाढदिवसाची पार्टी मात्र काल रात्रीच रंगली. काही ...

Happy Birth Day Sussanne: Celebrated Hrithik's X-Wife Sujain Khan's Birthday Party! | ​Happy Birth Day Sussanne: अशी साजरी झाली हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खानची बर्थ डे पार्टी!

​Happy Birth Day Sussanne: अशी साजरी झाली हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खानची बर्थ डे पार्टी!

तिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान हिचा आज (२६ आॅक्टोबर) वाढदिवस. पण या वाढदिवसाची पार्टी मात्र काल रात्रीच रंगली. काही निवडक मित्रांच्या उपस्थितीत बाराच्या ठोक्याला सुजैनचा वाढदिवस साजरा झाला. या पार्टीत सुजैनचा एक्स-हसबण्ड हृतिक रोशन यानेही हजेरी लावली. केवळ हजेरीच नाही तर त्याने व सुजैनने या पार्टीत धम्माल मस्तीही केली.





हृतिक रोशन व सुजैन खान  या दोघांचा घटस्फोट झालाय. पण दोघांमधीलही मैत्री अद्याप संपलेली नाही. घटस्फोटानंतरही दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. हृतिकच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमात सुजैन आवर्जून हजेरी लावली. दोघेही मुलांसोबत हॉली डे एन्जॉय करतात. खरे तर हृतिक व सुजैन यांच्या घटस्फोटानंतर अनेक चर्चा रंगल्या. या घटस्फोटामागचे कारण काय, यानिमित्ताने नाही नाही ते बोलले गेले. पण याऊपरही अटीतटीच्या वेळी एक्स वाईफ सुजैन हृतिकच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहत आलीय. अलीकडे हृतिक व कंगना राणौत या दोघांच्या वादातही सुजैने हृतिकला खंबीर पाठींबा देताना दिसली.चर्चा खरी मानाल तर, सुजैन हिनेच हृतिकला आपली बाजू मांडण्याचा सल्ला दिला. कंगनाचे सगळे आरोप खोटे आहेत, यावर सुजैनचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे तिनेच आपल्या एक्स-हसबण्डला याप्रकरणी लोकांसमोर येण्यासाठी राजी दिले. मी तुझ्या पाठीशी आहे. सगळ्या आरोपांना खंबीरपणे सामोरे जा, असे सुजैनने हृतिकला सांगितल्याचे कळते. आता अशास्थितीत सुजैनचा वाढदिवस हृतिक कसे बरे विसरणार होता.



३९ वा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी सुजैन तिचा भाऊ अभिनेता जायेद खान याच्यासोबत पोहोचली. भावाच्या हातात हात घालून तिची जबरदस्त एन्ट्री झाली. रोशन कुुटुंबाचा जवळचा स्रेही करण जोहरही या पार्टीला पोहोचला.





टिष्ट्वंकल खन्ना हिनेही सुजैनच्या पार्टीला हजेरी लावली. अभिनेत्री गायत्री जोशीसोबत तिने अशी मस्त पोझ दिली. कुणाल कपूर आणि त्याची पत्नी नैना बच्चन यांनीही सुजैनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ]



अभिनेत्री सोनाली ब्रेंदे ही सुद्धा या पार्टीला पोहोचली. चला तर आपणही सुजैलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ यात.

ALSO READ: Shocking Revelations !! कंगना राणौतच्या आरोपांना हृतिक रोशनने अशी दिली उत्तरे!

Web Title: Happy Birth Day Sussanne: Celebrated Hrithik's X-Wife Sujain Khan's Birthday Party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.