Half Girlfriend motion poster : पाहा, अर्जुन कपूर व श्रद्धा कपूरचा ‘आशिकी’ पोझमधील रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 14:38 IST2017-03-28T05:27:20+5:302017-03-28T14:38:37+5:30

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या आगामी ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाचे नवा लूक आज जारी करण्यात आला.

Half Girlfriend motion poster: See, Arjun Kapoor and Shraddha Kapoor's 'Aashiqui' romance in Pose! | Half Girlfriend motion poster : पाहा, अर्जुन कपूर व श्रद्धा कपूरचा ‘आशिकी’ पोझमधील रोमान्स!

Half Girlfriend motion poster : पाहा, अर्जुन कपूर व श्रद्धा कपूरचा ‘आशिकी’ पोझमधील रोमान्स!

लिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या आगामी ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर आज जारी करण्यात आले. यात अर्जुन व श्रद्धा दोघेही पावसात एकमेकांचा हात पकडून उभे दिसत आहेत. निश्चितपणे या पोस्टरने श्रद्धाच्या ‘आशिकी2’च्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. आता या नव्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली नसेल तर नवल.  यापूर्वीच्या पोस्टरमध्ये श्रद्धा स्पोर्टी लूकमध्ये दिसली होती. यात ती बास्केटबॉल खेळताना दिसली होती. या चित्रपटासाठी अर्जुन व श्रद्धा दोघांनीही बास्केटबॉलचे प्रशिक्षण घेतलेयं. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनने या दोघांना प्रशिक्षण दिले होते.
 


मोहित सूरी दिग्दर्शित हा चित्रपट एकता कपूर व शोभा कपूर यांची निर्मिती आहे. येत्या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणा-या या चित्रपटात एका बिहारी तरूणाची कथा दिसणार आहे. हा चित्रपट चेतन भगत यांच्या कादंबरीवर आधारित आहे. अर्थात मोहित सूरीने जशीच्या तशी कथा उचललेली नसून यात काही बदल केलेले आहेत. बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातील रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित चित्रपटात श्रद्धा प्रथमच काम करते आहे. याऊलट अर्जुनची ही दुसरी वेळ आहे. याआधी चेतन भगतच्या एका नॉवेलवर आधारित ‘२ स्टेट्स’मध्ये अर्जुन दिसला होता.
लवकरच श्रद्धा ‘हसीना’ या चित्रपटात दिसणार आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमात श्रद्धा चार वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.

Web Title: Half Girlfriend motion poster: See, Arjun Kapoor and Shraddha Kapoor's 'Aashiqui' romance in Pose!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.