'हॅक्ड' सिनेमाच्या अभिनेत्याला या कारणामुळे राहायचे सोशल मीडियापासून लांब, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 06:30 AM2020-02-03T06:30:00+5:302020-02-03T06:30:00+5:30

मोहित फिटनेसबाबत खूप सजग असतो. त्याची पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. त्याचे फोटो पाहून तरूणीही त्याच्यावर फिदा होतील असेच आहे.

The 'hacked' Movie Actor Mohit Malhotra Wants To Stay Away From Social Media For This Reason | 'हॅक्ड' सिनेमाच्या अभिनेत्याला या कारणामुळे राहायचे सोशल मीडियापासून लांब, जाणून घ्या कारण

'हॅक्ड' सिनेमाच्या अभिनेत्याला या कारणामुळे राहायचे सोशल मीडियापासून लांब, जाणून घ्या कारण

googlenewsNext

डिजीटल का है जमाना म्हणत कलाकार मंडळी सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असतात. आपल्या खाजगी आणि प्रोफेशनला आयुष्याशी निगडीत सगळ्या अपडेट ते आधी सोशल मीडियावरच चाहत्यांसह शेअर करतात. ते दिवसभरात काय करतात कुठे जातात याविषयी सगळी माहिती आपल्याला सोशल मीडियामुळेच कळते. अनेक कलाकार तर स्वतःच्या पब्लिसिटीसाठीच सोशल मीडियाचा वापर करतात. मात्र एक कालाकर या गोष्टीला अपवाद ठरला आहे. 'हॅक्ड' सिनेमाचा अभिनेता मोहित मल्होत्राला आता सोशल मीडियापासूनच लांब जायचे आहे. मोहित हॅक्ड या सिनेमात हिना खानसह पाहायला मिळत आहे. 

हिना खानचा हा पहिला हिंदी सिनेमा असून विक्रम भट्ट यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सेटवर हिनासह त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. याविषयी तो म्हणाला, हिना खान खूपच चांगली आहे. आम्ही सेटवर खूपच धमाल केली. आम्ही दोघे तिच्या चांगल्या आहाराच्या सवयीवर बराच वेळ बोलायचो. दिवसभर तिच्यासोबत मीदेखील हेल्दी स्नॅक्स खायचो.

मोहित फिटनेसबाबत खूप सजग असतो. त्याची पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. त्याचे फोटो पाहून तरूणीही त्याच्यावर फिदा होतील असेच आहे. त्याच्या सोशल मीडियावर त्याला लाखों चाहते फॉलो करतात. त्याच्या चाहत्यांमध्ये तरूणींची संख्या मोठी आहे. त्याची लोकप्रियता पाहता आगामी काळात तो कोणत्या प्रोजेक्टमध्ये झळकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: The 'hacked' Movie Actor Mohit Malhotra Wants To Stay Away From Social Media For This Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.