'हातात गन, डोक्यात मिशन'; 'सिंघम अगेन'मधील करिना कपूरचा फर्स्ट लूक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 04:40 PM2023-11-08T16:40:12+5:302023-11-08T16:41:43+5:30

रोहित शेट्टीच्या बहुचर्चित 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोणची वर्णी लागली होती.

'Gun in hand, mission in head'; Kareena Kapoor's look in Singham Again is out by rohit shetti | 'हातात गन, डोक्यात मिशन'; 'सिंघम अगेन'मधील करिना कपूरचा फर्स्ट लूक रिलीज

'हातात गन, डोक्यात मिशन'; 'सिंघम अगेन'मधील करिना कपूरचा फर्स्ट लूक रिलीज

२०११ साली प्रदर्शित झालेल्या 'सिंघम' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गर्दी केली होती. त्यामुळेच, बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सिंघम रिटर्नच्या माध्यमातून सिक्वेलही रिलीज केला. अजय देवगणच्या सिंघम रिटर्न्सलाही चाहत्यांनी दाद दिली. त्यानंतर, आता चाहत्यांच्या प्रेमापोटी तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचा सीक्वल 'सिंघम रिटर्न' २०१४ला प्रदर्शित झाला होता. आता 'सिंघम अगेन'साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात आता बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरची एन्ट्री झाली आहे. 

रोहित शेट्टीच्या बहुचर्चित 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोणची वर्णी लागली होती. चित्रपटातील दीपिकाचा पहिला लूक गेल्याच महिन्यात प्रेक्षकांसमोर आला होता. 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात ती शक्ती शेट्टी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन 'सिंघम अगेन'मधील पहिल्या लूकचं पोस्टर शेअर केलं होतं. आता, दीपिकाच्या जोडीला अवनी बाजीराव सिंघम बनून करिना कपूरही झळकणार आहे. सिंघमची ताकद म्हणजे अवनी बाजीराव सिंघमचा पहिला लूक पाहा, अशी पोस्ट रोहित शेट्टीने केली आहे.

सिंघम अगेन चित्रपटातील करिनाचा पहिला लूक समोर आला आहे. खिलाडीकुमार अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी या सिंघम अगेनमधील करिनाचं लूक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यामध्ये, हातात बंदूक आणि जखमांनी भरलेला डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केले आहे. 

दरम्यान, १५ ऑगस्ट २०१४ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमासाठी तगडी स्टारकास्ट असून यापूर्वीच दीपिका पदुकोण, रणबीर सिंह, टायगर श्रॉफ यांचे लूक समोर आले आहेत. आता, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्या लुकची वाट प्रेक्षक पाहत आहेत. दरम्यान, १५ ऑगस्ट २०२४ रोजी अल्लु अर्जुनचा पुष्पा २ हाही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे, सिंघम अगेन आणि पुष्पा २ मध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

 

Web Title: 'Gun in hand, mission in head'; Kareena Kapoor's look in Singham Again is out by rohit shetti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.