गुल पनागला सोडायचंय ह्या गोष्टीचं व्यसन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 12:06 PM2018-10-05T12:06:40+5:302018-10-06T07:15:00+5:30

अभिनेत्री गुल पनाग 'बायपास रोड' चित्रपटात नील नितीन मुकेशबरोबर दिसणार आहे.

Gul Panag addicted with this thing | गुल पनागला सोडायचंय ह्या गोष्टीचं व्यसन

गुल पनागला सोडायचंय ह्या गोष्टीचं व्यसन

googlenewsNext
ठळक मुद्देगुल पनाग लवकरच करणार कमबॅक'बायपास रोड' सिनेमात गुल पनाग दिसणार प्रमुख भूमिकेत


अभिनेत्री गुल पनाग सध्या बॉलिवूडमधून गायब आहे. त्यामुळे तिच्या नावाची कुठं चर्चा होताना दिसत नाही. मात्र आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिला मोबाईल फोनचे व्यसन लागले आहे. ती मोबाईलवर सक्रीय असते आणि तिला या मोबाईलचे व्यसन सोडायचे आहे. त्यासाठी ती खूप प्रयत्न करते आहे.

गुल पनागने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. त्यात ती मोबाइलवर ऑनलाइन चॅट करताना दिसतेय. या मोबाईलपासून कशी सुटका करू, असा प्रश्‍नही तिने स्वतःच विचारला आहे. मोबाईलची सवय सोडण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्याला मोबाईलचे व्यसन आहे, हे मान्य करणे आहे. ही गोष्ट तिने मान्य केली आहे. म्हणूनच आता हे व्यसन कसे सोडवायचे याचा शोध ती घेते आहे.


गुल पनाग बायपास रोड चित्रपटातून कमबॅक करणार आहे. यात ती नील नितीन मुकेशबरोबर दिसणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्याचे चित्रीकरण अलिबाग आणि लोणावळ्यात सुरू होते. या सिनेमात ती निगेटिव्ह रोल साकारणार असल्याचेही समजले होते. एवढेच नव्हे तर करण जोहरच्या स्टुडंट ऑफ इयर 2मध्ये ती स्पोर्टस कोचच्या रोलमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात होते.
गुल पनागने मॉडेलिंगमधून करियरला सुरूवात केली. इतकेच नाही तर सुरूवातीच्या काळात पायलटचे प्रशिक्षणही घेतले आहे. तिच्याकडे पायलट लायसन्सही आहे. एवढेच नाही तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत आपकडून तिने निवडणूकही लढवली होती. पण भाजपच्या किरण खेरकडून तिचा पराभव झाला होता. दरम्यानच्या काळात ती संसारात रमली होती. आता मातृत्वाची सुट्टी एन्जॉय केल्यावर आणि एका गोड मुलाची आई झाल्यावर गुल आता पुन्हा सिनेसृष्टीकडे वळली आहे.

Web Title: Gul Panag addicted with this thing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.