गुजरातच्या ‘या’ भाजपा नेत्याची मुलगी इंटरनेटवर बनली सनसनी, लवकरच करणार बॉलिवूड एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 13:50 IST2017-10-24T08:20:53+5:302017-10-24T13:50:53+5:30

आपणही सुंदर दिसावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मग तो मुलगा असो वा मुलगी सुंदर दिसण्यासाठी या मंडळींकडून वाटेल ते ...

Gujarat's 'The BJP' leader's daughter became sensational, soon will be Bollywood entry! | गुजरातच्या ‘या’ भाजपा नेत्याची मुलगी इंटरनेटवर बनली सनसनी, लवकरच करणार बॉलिवूड एंट्री!

गुजरातच्या ‘या’ भाजपा नेत्याची मुलगी इंटरनेटवर बनली सनसनी, लवकरच करणार बॉलिवूड एंट्री!

णही सुंदर दिसावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मग तो मुलगा असो वा मुलगी सुंदर दिसण्यासाठी या मंडळींकडून वाटेल ते प्रयत्न केले जातात. डायटिंग, वर्कआउट, योगा यांसारखे फंडे वापरून आपला फिगर अधिक फिट आणि आकर्षक दिसावा यासाठी धडपड केली जाते. सध्या अशीच एक तरुणी तिच्या आकर्षक फिगरमुळे इंटरनेटवर सनसनी बनली आहे. आतापर्यंत या तरुणीचे केवळ तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर १५ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स निर्माण झाले आहेत. तिची वाढती लोकप्रियता बघून आता बरेचसे बॉलिवूड निर्माते तिला लॉन्च करण्याची धडपड करीत असल्याने लवकरच ती बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. ही तरुणी गुजरातमधील एका मोठ्या भाजपा नेत्याची मुलगी असून, सध्या फिटनेस ट्रेनर म्हणून काम करीत आहे. 





गुजरातच्या माजी आरोग्य मंत्र्यांची मुलगी असलेल्या सपना व्यास पटेलचे रूप बघून कोणी घायाळ होणार नाही तरच नवल. त्यामुळे सपना सध्या इंटरनेटवर जबरदस्त लोकप्रियता मिळवित आहे. ज्या पद्धतीने सपनाने स्वत:चा फिगर मेंटेण्ड ठेवला आहे, त्यावरून ती एखादी मॉडेल अथवा सेलिब्रिटी असावी, असाच अनेकांचा समज आहे. वास्तविक सपनाने लाइफस्टाइल मॅनेजमेंटमध्ये पीएचडी केली असून, सध्या ती फिटनेस ट्रेनर म्हणून काम करीत आहे. खरं तर हा फिट फिगर मिळविण्यासाठी सपनाने प्रचंड मेहनत घेतली आहे. सुरुवातीला सपनाचे वजन सुमारे ८६ किलो एवढे होते, परंतु पुढे तिने नियमित वर्कआउट करून ३३ किलो वजन घटविले. सध्या तिचे वजन ५५ किलो असून, ती खूपच सुंदर दिसते. 







सपनाचा जन्म १० नोव्हेंबर १९८९ मध्ये झाला. ती गुजरातमधील माजी मंत्री जय नारायण व्यास यांची मुलगी आहे. सपनाने तिचे शालेय शिक्षण अहमदाबाद येथे पूर्ण केले. त्यानंतर तिने इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट निरमा युनिव्हर्सिटी येथून एमबीए पूर्ण केले. पुढे तिने लाइफस्टाइल ब्रॅण्ड मॅनेजमेंटमध्ये पीएचडी केली. सपनाचे सौंदर्य बघून कोणीही तिला अभिनेत्री म्हणूनच संबोधतात. त्यामुळे सपनाची जर बॉलिवूडमध्ये एंट्री झाली तर तिला कमीत कमी कालावधीत प्रचंड लोकप्रियता मिळेल यात शंका नाही. दरम्यान, काही निर्माते तिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची धडपड करीत असून, लवकरच ती मोठ्या बॅनरच्या चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. 









दरम्यान, सपना तिचे खूपच आकर्षक आणि हॉट लूक असलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करून धूम उडवून देत आहे. त्यामुळेच इन्स्टाग्रामवर तिचे झपाट्याने लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स वाढत आहेत. शिवाय फेसबुकवरही ती प्रचंड लोकप्रिय होत आहे. तिच्या प्रत्येक फोटोला लाखोंच्या संख्येत लाइक्स मिळत आहेत. खरं तर सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होण्याचाही एक मजेशीर किस्सा आहे. कारण सपना तेव्हा चर्चेत आली होती, जेव्हा आसाम येथील भाजपा आमदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री अंगुरलता यांच्या नावाने तिचे फोटो व्हायरल झाले होते. काही काळानंतर जेव्हा याबाबतचा शोध घेण्यात आला तेव्हा सपना व्यास पटेल हे नाव समोर आले. 

Web Title: Gujarat's 'The BJP' leader's daughter became sensational, soon will be Bollywood entry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.