​ ‘ढिशूम’च्या सेटवर काय करतोयं गोविंदाचा मुलगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 22:08 IST2016-07-21T16:38:38+5:302016-07-21T22:08:38+5:30

अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यास उत्सूक आहेत. यापैकीच एक म्हणजे, गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा. यशवर्धनला अभिनेता बनायचे आहे आणि वरूण धवनसोबत कॉमेडी करणे हे त्याचे स्वप्न आहे. कदाचित म्हणून तो वरूणला फॉलो करत असावा..होय, अलीकडे ‘ढिशूम’च्या सेटवर यशवर्धन दिसला.

Govinda's son works on the set of 'Dashoom' | ​ ‘ढिशूम’च्या सेटवर काय करतोयं गोविंदाचा मुलगा!

​ ‘ढिशूम’च्या सेटवर काय करतोयं गोविंदाचा मुलगा!

ेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यास उत्सूक आहेत. यापैकीच एक म्हणजे, गोविंदाचा मुलगा  यशवर्धन आहुजा. यशवर्धनला अभिनेता बनायचे आहे आणि वरूण धवनसोबत कॉमेडी करणे हे त्याचे स्वप्न आहे. कदाचित म्हणून तो वरूणला फॉलो करत असावा..होय, अलीकडे ‘ढिशूम’च्या सेटवर यशवर्धन  दिसला. ‘ढिशूम’मधील ‘जानेमन..’गाण्याचा व्हिडिओ तयार होत असताना यशवर्धन  सेटवर हजर होता. आता यशवर्धन इथे काय करत होता, ठाऊक नाही. मात्र आपला चेहरा लपवताना तो दिसला. व्हिडिओमध्ये वरूण आणि परिणीती मस्ती करण्यात दंग दिसताहेत तर यशवर्धन  त्यांच्या उजव्या बाजूला स्वत:ला लपवताना दिसतो आहे. आता यशवर्धन  इथे रोहित धवनला अस्टिस्ट करीत होता की सेटवर काय काय घडते ते बघत होता, ते त्याचे तोच जाणो..तूर्तास तरी या प्रश्नाचे उत्तर त्यालाच ठाऊक आहे.
 

Web Title: Govinda's son works on the set of 'Dashoom'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.