​गोविंदाचा मुलगा चंदेरी दुनियेसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 12:49 IST2016-05-07T07:19:16+5:302016-05-07T12:49:16+5:30

‘स्टार पुत्रां’चे बॉलिवूडमध्ये पदार्पण तशी काही नवी गोष्ट नाही. स्टार आईवडिलांच्या पुण्याईचा (ओळखीचर!) फायदा घेत चंदेरी दुनियेत आपले भविष्य ...

Govinda's son Chanderi is ready for the world | ​गोविंदाचा मुलगा चंदेरी दुनियेसाठी सज्ज

​गोविंदाचा मुलगा चंदेरी दुनियेसाठी सज्ज

्टार पुत्रां’चे बॉलिवूडमध्ये पदार्पण तशी काही नवी गोष्ट नाही. स्टार आईवडिलांच्या पुण्याईचा (ओळखीचर!) फायदा घेत चंदेरी दुनियेत आपले भविष्य उजळण्याचा तो प्रयत्न असतो.

काही स्टारपुत्र खरोखरचं प्रतिभावान असतात (उदा. हृतिक, रणबीर) आणि काही केवळ स्टार आडनावामुळे इंडस्ट्रीमध्ये टिकून राहतात.

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणाऱ्या स्टारपुत्रांमध्ये आणखी एक नाव लवकरच जोडले जाण्याची शक्यता आहे. गोविंदाचा मुलगा यशवर्धन आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. लंडनच्या मेट फिल्म स्कूलमधून शिकून हा 20 वर्षीय स्टार किड भारतात परत आला आहे. 

सध्या तो साजिद नाडियाडवाला यांच्या मार्गदर्शनखाली ‘किक २’मध्ये सहाय्यक म्हणून काम करत आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार तो अभिनयात उडी घेण्यापूर्वी चित्रपटनिर्मितेचे सगळे बारकावे, जसे की एडिटिंग व पटकथा लिखाण शिकणार आहे.

इम्तियाज अली यशवर्धनचा सर्वात आवडीचा दिग्दर्शक आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी फार उत्सुक आहे. तसेच कॉमेडी फिल्मचा बादशाह डेव्हिड धवनसोबतही काम करण्याची त्याची इच्छा आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या शुभेच्छा

Web Title: Govinda's son Chanderi is ready for the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.