गोविंदा बनला मुंबई पोलिसांसाठी डोकेदुखी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 16:00 IST2017-03-19T10:30:23+5:302017-03-19T16:00:23+5:30

सध्या अभिनेता गोविंदा त्याच्या ‘आ गया हीरो’ या सिनेमामुळे लाइमलाइटमध्ये आहे. मात्र त्याचबरोबर तो आणखी एका कारणाने चर्चेत आहे ...

Govinda becomes headache for Mumbai police! | गोविंदा बनला मुंबई पोलिसांसाठी डोकेदुखी!

गोविंदा बनला मुंबई पोलिसांसाठी डोकेदुखी!

्या अभिनेता गोविंदा त्याच्या ‘आ गया हीरो’ या सिनेमामुळे लाइमलाइटमध्ये आहे. मात्र त्याचबरोबर तो आणखी एका कारणाने चर्चेत आहे ते म्हणजे मुंबई पोलीस. आता तुम्ही म्हणाल की, मुंबई पोलीस आणि गोविंदाचा काय संबंध? मात्र सुरक्षा रक्षक या नात्याने त्यांचा गोविंदाशी संबंध येत आहे. परंतु काहीसा अंधश्रद्धाळू वृत्तीचा असलेल्या गोविंदाने या पोलिसांना असे काही नाकीनव आणले की, त्यांच्यासाठी गोविंदा सध्या डोकेदुखी ठरत आहे. 

त्याचे झाले असे की, गोविंदा हा ‘अंकशास्त्र’ आणि ‘कुंडली’वर प्रचंड विश्वास ठेवतो. या कारणामुळे तो त्याच्या गुरुजींचा (पंडित) सल्ला घेतल्याशिवाय घराबाहेरदेखील पाऊल ठेवत नाही. हाच विषय मुंबई पोलिसांसाठी डोकेदुखीचे कारण ठरत आहे. कारण आतापर्यंत १९ पोलिसांना गोविंदाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. मात्र कुठल्याच कुंडलीत या पोलिसांच्या त्याच्या सुरक्षेशी ताळमेळ बसत नसल्याने त्याचे गुरुजी सातत्याने पोलीस कर्मचारी रिजेक्ट करीत आहेत. 



त्यामुळे मुंबई पोलिसांना गोविंदाच्या सुरक्षेत नेमका कसा पोलीस कर्मचारी द्यावा, असा प्रश्न आता त्यांच्यासमोर उपस्थित होत आहे. केवळ पोलिसांच्या बाबतीतच नव्हे तर गोविंदा आणखीही बºयाच कारणांनी अंधश्रद्धाळू आहे. गुरुवारच्या दिवशी गोविंदा कोणाकडूनही पैसे स्वीकारत नाही. जर या दिवशी कोणी त्याला पेमेंट देत असेल तर तो त्यास स्पष्ट शब्दात नकार देतो. त्याचबरोबर तो ‘सीढी’च्या खालून जाण्यासही अशुभ मानतो. 

जर एखादे मांजर आडवे गेले तर तो त्यास प्रचंड अशुभ समजतो. वास्तविक फिल्म इंडस्ट्रीमध्ये गोविंदा हा एकमेव कलाकार नाही जो अशाप्रकारच्या श्रद्धा बाळगतो. बरेचसे असे सेलेब्स आहेत, जे गुरुजींचा सल्ला घेतल्याशिवाय घराबाहेरदेखील पाऊल ठेवत नाहीत. मात्र गोविंदाप्रमाणे पोलिसांशी संबंधित त्यांच्या श्रद्धा नसल्याने ते या कारणामुळे फारसे लाइमलाइटमध्ये आलेले नसावेत. 

Web Title: Govinda becomes headache for Mumbai police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.