​‘सरकार’ ते ‘सरकार3’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2017 09:11 AM2017-05-10T09:11:56+5:302017-05-10T14:41:56+5:30

राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सरकार3’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा लवकर प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ‘सरकार3’ पाहून प्रेक्षकांना नव्या राम गोपाल ...

'Government' to 'Government 3' !! | ​‘सरकार’ ते ‘सरकार3’!!

​‘सरकार’ ते ‘सरकार3’!!

googlenewsNext
म गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सरकार3’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा लवकर प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ‘सरकार3’ पाहून प्रेक्षकांना नव्या राम गोपाल वर्माने जन्म घेतला, असे वाटेल, हे शब्द आहेत, अभिनेता मनोज वाजपेयी याचे. मनोज वाजपेयी याचे हे शब्द किती खरे ठरतात, हे लवकरच कळेल. पण राम गोपाल वर्मा नावाच्या अजब रसायन असलेल्या दिग्दर्शकाने बनलेले ‘सरकार’सीरिजचे ‘सरकार’ व ‘सरकारराज’ हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या मनात अजूनही जिवंत आहेत. त्यामुळेच ‘सरकार3’कडून प्रेक्षकांनाच बरीच अपेक्षा आहे.  



२००५ मध्ये रामगोपाल यांचा ‘सरकार’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ‘द गॉडफादर’ या हॉलिवूड सिनेमावर बेतलेल्या या सिनेमात अमिताभ बच्चन आणि त्याचा मुलगा अभिषेक बच्चन या पिता-पुत्राची जोडी एकत्र दिसली होती. केके मेनन याचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका होती. सुभाष नागरे नावाच्या मुंबईतील एका बलाढ्य व लोकप्रीय व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबाची कथा यात रेखाटली गेली होती. 
रामगोपाल यांचा हा पॉलिटिकल ड्रामा आला आणि बॉक्सआॅफिसवर सुपरहिट झाला. विशेषत: अमिताभ यांनी पडद्यावर जिवंत केलेली सुभाष नागरेची भूमिका अफलातून ठरली. तिकिट बारीवर हा चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर राम गोपाल यांच्या मनाने या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार, २००८ मध्ये ‘सरकारराज’ नावाचा सिनेमा आला.



या सीक्वलमध्येही पुन्हा अमिताभ आणि अभिषेक ही पितापुत्राची जोडी रिपीट झाली. केवळ एवढेच नाही तर अमिताभ व अभिषेक यांच्या जोडीला ऐश्वर्या रायही दिसली. या चित्रपटातही अमिताभ यांनी सुभाष नागरेची मध्यवर्ती भूमिका साकारली.
 सरकार सीरिजमधील हा दुसरा  चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला होता अर्थात  कमाईच्या बाबतीत ‘सरकार’च्या तुलनेत ‘सरकार राज’ काहीसा मागे राहिला होता. याचे कारण म्हणजे, ‘सरकार’च्या तुलनेत ‘सरकार राज’चे काहीसे दुबळे संवाद. कदाचित ही चूक राम गोपाल यांच्या लक्षात आलीय.  त्यामुळे तब्बल ९ वर्षांनंतर येणाºया ‘सरकार’सीरिजच्या तिसºया भागात म्हणजेच ‘सरकार3’मध्ये ही सगळी कसर भरून काढण्याचे त्यांनी ठरवले आहे. कुठलीही रिस्क न घेता, वर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन आणि संवाद यावर भरपूर मेहनत केली आहे.



‘सरकार3’मध्ये पुन्हा एकदा अमिताभ यांची वर्णी लागली आहे. अर्थात अभिषेक व ऐश्वर्याचा पत्ता कट झालाय. खरे तर ‘सरकार’ शिवाय अमिताभ यांच्यासोबत काम करण्याचा मला पश्चाताप आहे, असे रामगोपाल जाहिरपणे म्हणाले होते. यावरून वाद झाल्यावर, माझ्या म्हणण्याचा अर्थ माझ्या अन्य सिनेमांत त्यांची भूमिका तितकी सशक्त नव्हती, असा होता, असे सांगून वर्मा यांनी या वादावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. पण या वादाऊपर अमिताभ पुन्हा एकदा रामगोपाल यांच्या ‘सरकार3’मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जातेय. पण वर्मा यांनी हा दावा नाकारला आहे. ‘सरकार3’चे बाळासाहेब ठाकरे यांचे या चित्रपटाशी काहीही देणे घेणे नाही. मात्र हा चित्रपट त्यांच्यामुळे प्रभावित आहे, असे वर्मा यांनी म्हटले आहे.  

Web Title: 'Government' to 'Government 3' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.