‘उडता पंजाब’वर बंदीचा बादल सरकारचा विचार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 16:32 IST2016-06-12T11:02:46+5:302016-06-12T16:32:46+5:30

शिरोमणी अकाली दलच्या अनुसार पंजाब सरकार ‘उडता पंजाब’ चित्रपटावर बंदी आणण्याचा विचारात नाही.  पक्षाचे सचिव, प्रवक्ता आणि शिक्षण मंत्री ...

The government does not consider the cloud of ban on 'Flying Punjab' | ‘उडता पंजाब’वर बंदीचा बादल सरकारचा विचार नाही

‘उडता पंजाब’वर बंदीचा बादल सरकारचा विचार नाही

रोमणी अकाली दलच्या अनुसार पंजाब सरकार ‘उडता पंजाब’ चित्रपटावर बंदी आणण्याचा विचारात नाही. 
पक्षाचे सचिव, प्रवक्ता आणि शिक्षण मंत्री दलजितसिंग चीमा यांच्या अनुसार शिरोमणी अकाली दल, माध्यमे किंवा निर्मितीच्या विरुद्ध नाही. पक्षाने नेहमीच अभिव्यक्ती किंवा रचनात्मकतेचे समर्थन केले आहे. शिरोमणी अकाली दलने १९७५ साली आणीबाणीच्या काळात माध्यमांच्या स्वतंत्रेविषयी सर्वात प्रथम आंदोलन केले होते. शिरोमणी अकाली दल हा चित्रपट सेन्सॉर करण्याच्या विरोधात असल्याचे जे सांगण्यात येत आहे, ते अगदी चुकीचे आहे. शिरोमणी अकाली दलाने निवडणूक आयोगाकडे हस्तक्षेपाची मागणी करुन सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये त्यांच्या पक्षाची असलेली भूमिका स्वीकारली पाहिजे. त्यांनी स्वत: केलेल्या ट्विटमध्ये सहनिर्माता समीर नायर यांचे स्वागत केले आहे. यामुळे निर्माता आपचा सक्रीय सदस्य असल्याचे सिद्ध झाल्याचे, चीमा यांनी सांगितले.
आपकडून चित्रपटाच्या निर्मात्याशी संबंध नसल्याची पोलखोल झाली आहे. बालाजी टेलिफिल्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पक्षाच्या संचार शाखेचे सक्रीय सदस्य आहेत. यामुळे उडता पंजाबच्या निर्मितीमध्ये आपच्या सक्रीय सदस्याची प्रमुख भूमिका आहे. आप पक्षाने पंजाबला बदनाम करु नये. पंजाब हा नशील्या पदार्थांचा स्वर्ग आहे, हे दाखविण्याचा आप पक्ष प्रयत्न करीत असल्याचा आरोप चीमा यांनी केला.






Web Title: The government does not consider the cloud of ban on 'Flying Punjab'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.