​आनंदाची बातमी! होय, ‘डॉन3’ येणार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 10:21 IST2017-06-21T04:51:19+5:302017-06-21T10:21:19+5:30

शाहरूख खान व प्रियांका चोप्रा स्टारर ‘डॉन’ लोकांना आवडलाच नाही तर या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर शानदार कमाईही केली. चाहत्यांना मनापासून ...

Good news! Yes, 'Don 3' will come !! | ​आनंदाची बातमी! होय, ‘डॉन3’ येणार!!

​आनंदाची बातमी! होय, ‘डॉन3’ येणार!!

हरूख खान व प्रियांका चोप्रा स्टारर ‘डॉन’ लोकांना आवडलाच नाही तर या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर शानदार कमाईही केली. चाहत्यांना मनापासून या चित्रपटाच्या सीक्वलची प्रतीक्षा आहे. तुम्हीही ‘डॉन’च्या फ्रॅन्चाईजीची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, या अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटाचा सीक्वल लवकरच बनणार आहे.
फरहान अख्तर व रितेश सिधवानी यांच्या प्रॉडक्शन कंपनीने १९७८ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन स्टारर ‘डॉन’चे राईट्स खरेदी केले होते.  या कंपनीनीने नंतर २००६ मध्ये शाहरूखला घेऊन याच नावाने चित्रपट आणला. २०११ मध्ये शाहरूख व प्रियांका यांच्यासह वेगळ्या रूपातील ‘डॉन’ आपल्याला पाहायला मिळाला. आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा पुढचा पार्ट म्हणजेच ‘डॉन3’ बनवण्याचा विचार चालवला आहे. रितेश सिधवानीने स्वत: याबाबतचे संकेत दिले आहेत.  ‘डॉन3’बद्दल विचार सुरु आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जाते. आम्ही लवकरच याबाबची अधिकृत घोषणा करू शकतो, असे सिधवानीने म्हटले.
एकंदर काय तर ‘डॉन3’ येणार हे नक्कीच आहे. अर्थात यात कुणाची वर्णी लागेल, हे तूर्तास सांगता येणार नाही. शाहरूख की आणखी कुणी हे वेळ आल्यानंतरच कळेल. सध्या शाहरूख खान त्याच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात शाहरूखसोबत अनुष्का शर्मा दिसणार आहे. याशिवाय शाहरूख आनंद एल रायच्या एका चित्रपटातही काम करतो आहे. येत्या शुक्रवारी रिलीज होणाºया सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ या सिनेमात शाहरूख कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. त्यामुळे सध्या तरी, ‘डॉन3’बद्दल तुम्ही किती उत्सुक आहात, हे सांगण्याची वेळ आहे. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची मते लिहू शकता.

Web Title: Good news! Yes, 'Don 3' will come !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.