ही बॉलिवूड गायिका लवकरच देणार आहे गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 11:05 AM2017-11-08T11:05:27+5:302017-11-08T16:35:27+5:30

'पिया आए ना', 'तुम जो आए' सारख्या गाण्यांमधून रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या तुलसी कुमारच्या फॅन्ससाठी आमच्याकडे ...

Good news will soon be given to a Bollywood singer | ही बॉलिवूड गायिका लवकरच देणार आहे गुड न्यूज

ही बॉलिवूड गायिका लवकरच देणार आहे गुड न्यूज

googlenewsNext
'
;पिया आए ना', 'तुम जो आए' सारख्या गाण्यांमधून रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या तुलसी कुमारच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक गुड न्यूज आहे. तुलसी कुमार लवकरच आई होणार आहे. तुलसी स्वत: आपल्या फॅन्ससोबत ही गोड बातमी शेअर केली. पुढच्या वर्षी 2018 मध्ये तुलसीच्या घरी बाळाचं आगमन होणार आहे. एक याद पुरानी हे तिचे काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेले गाणं रसिकांच्या पसंतीस उतरले होते. टी- सीरिजचे मालक गुलशन कुमार यांची ती कन्या आहे. तुलसीने 2015 मध्ये दिल्लीचा उद्योगपती हितेश रल्हनसोबत जयपूरमध्ये शाही विवाह केला होता.  

तुलसीने आपल्या करिअरची सुरुवात हिमेश रेशमियासोबत 2009 मध्ये आलेल्या 'लव्ह हो गया' या अल्बममधून केली होती. समीक्षकांना आणि रसिकांना दोघांही हा अल्बम आवडला होता. 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' चित्रपटातील तुम जो आये जिंदगी मैं बात बन गई हे गाणं तिच्या करिअरचे टर्निंग पाईंट ठरेल. या गाण्यामुळे तुलसीला खरी ओळख मिळाली. 

तुलसीचे वडिल गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करण्यात येतो आहे. या चित्रपटाचे नाव मोगल आहे.  या चित्रपटाची निर्मितीदेखील गुलशन कुमार यांचीच कंपनी टी-सीरिज करणार आहे. अक्षय या चित्रपटात गुलशन कुमार यांच्या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गुलशन कुमार यांची हत्या भर दिवसा अंधेरीतील एका मंदिराच्या बाहेर झाली होती. गुलशन कुमार यांचे प्रतिस्पर्धी संगीतकार नदीम हे या हत्येत आरोपी होते. या हत्येमुळे कशाप्रकारे व्यवसायिक, सेलिब्रेटी यांना खंडणीसाठी अंडरवर्ल्डकडून धमक्या दिल्या जात आहेत, हे समोर आले होते.अक्षय कुमार या चित्रपटात गुलशन कुमार यांची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे. याविषयी तो सांगतो, "गुलशन कुमार यांच्यासोबत मला माझ्या सौंगध या पहिल्या चित्रपटापासूनच काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांना मी खूप चांगल्याप्रकारे ओळखत होतो. आम्ही दोघेही सारख्याच पार्श्वभूमीतून आल्यामुळे आमच्यात अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे. त्यामुळे गुलशन कुमार यांना पडद्यावर साकारण्यास मी खूप उत्सुक आहे." 

Web Title: Good news will soon be given to a Bollywood singer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.