Good News! सलमान खान पहिल्यांदाच करणार ही गोष्ट, वाचून म्हणाल अरे वाह!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 05:52 PM2020-04-14T17:52:56+5:302020-04-14T17:53:32+5:30

सलमान खानच्या चाहत्यांसाठी आहे गुड न्यूज

Good News! This is the first thing Salman Khan will do TJL | Good News! सलमान खान पहिल्यांदाच करणार ही गोष्ट, वाचून म्हणाल अरे वाह!

Good News! सलमान खान पहिल्यांदाच करणार ही गोष्ट, वाचून म्हणाल अरे वाह!

googlenewsNext

सलमान खानकडे नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्यासोबत जोडून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. आपल्या व्यक्तिगत जीवनातील अनेक गोष्टीदेखील तो नेहमीच आपल्या लाखो चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असतो.

सलमान खानच्या अगदी निकटतम सूत्रांनी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आणली असून लवकरच "बीइंग सलमान खान" नावाने सलमान खान आपले स्वत:चे यूट्यूब चॅनल सुरु करणार आहे. त्याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

सलमान खानच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे कारण आपल्या लाडक्या सुपरस्टारसोबत संवाद साधण्यासाठी, त्याच्यासोबत जोडून घेण्यासाठी आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याला अधिक जवळून जाणून घेण्यासाठी चाहत्यांना अजून एक हक्काचे मध्यम उपलब्ध होणार आहे.


सलमान खान द्वारे शेअर करण्यात येणारा प्रत्येक लहान मोठा कंटेंट त्यांच्या विशाल फैनबेसमुळे क्षणातच लोकप्रिय होत असतो. हे चॅनल हे एक असे मध्यम असेल ज्या ठिकाणी सलमान खान आपल्या चाहत्यांसाठी आपल्या खासगी आयुष्यातील प्रत्येक क्षण शेअर करू शकेल ज्यामुळे चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्याला अधिक जवळून अनभवू शकतील.

खरोखरच, सलमानच्या तमाम चाहत्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी असून आतापासूनच प्रत्येक जण यूट्यूबवर ’बीइंग सलमान खान’ चॅनलच्या लॉन्च होण्याची वाट बघतो आहे. 

Web Title: Good News! This is the first thing Salman Khan will do TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.