Good news! सेलिना जेटली पुन्हा एकदा बनणार जुळ्या मुलांची आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 10:41 IST2017-05-24T05:07:06+5:302017-05-24T10:41:17+5:30
अभिनेत्री सेलिना जेटली हिच्याकडे पुन्हा गुड न्यूज आहे. होय, सेलिना पुन्हा एकदा आई होणार आहे आणि तेही पुन्हा एकदा ...
.jpg)
Good news! सेलिना जेटली पुन्हा एकदा बनणार जुळ्या मुलांची आई
अ िनेत्री सेलिना जेटली हिच्याकडे पुन्हा गुड न्यूज आहे. होय, सेलिना पुन्हा एकदा आई होणार आहे आणि तेही पुन्हा एकदा जुळ्या मुलांची आई. सेलिनाला आधीच जुळी आहेत. सेलिनाची ही जुळी मुलं आता पाच वर्षांची झाली आहेत. विन्स्टन आणि विराज अशी या दोघांची नावे आहेत. आता सेलिना पुन्हा एकदा जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. सेलिना व तिचा पती पीटर हग या बातमीमुळे निश्चितपणे आनंदीत आहेत. यावर्षी आक्टोबरमध्ये सेलिना जुळ्या मुलांना जन्म देण्याची शक्यता आहे.
![]()
सेलिनाने याबद्दल माहिती दिलीय. ती म्हणाली, मी पुन्हा प्रेग्नेंट आहे, हे ऐकून मला आनंदच झाला. पण पुन्हा जुळी आहेत, हे माझ्यासाठी धक्कादायक होते. डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केले. पीटरने अगदी सहज म्हणून त्यांना विचारले की, याही वेळी जुळी आहेत का? डॉक्टरांनी हो म्हटले. त्यांचा होकार आमच्यासाठी काहीसा धक्कादायक होता. पण परमेश्वरांसाठी आम्ही स्पेशल पॅरेंट असू. कदाचित म्हणून त्यांनी आम्हाला खूप सारी मुलं देण्याचे ठरवले असेल, असे मानून आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. माझी आई मला नेहमी म्हणायची. आई-वडिल बनण्यासाठी कुठलाही परफेक्ट मार्ग नाही. पण परफेक्ट पालक बनण्याचे अनेक मार्ग आहेत. मी आणि पीटर आम्ही दोघांनीही अतिशय आनंदाने ही नवी जबाबदारी स्वीकारली आहे आणि आम्ही मी अतिशय योग्यरित्या पार पाडू.
माजी विश्वसुंदरी असलेल्या सेलिनाने २००१ साली फेमिना मिस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. तिने २००३ साली ‘जानशीन’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नो एन्ट्री, अपना सपना मनी मनी, गोलमाल रिटर्न्स इत्यादी काही तिचे गाजलेले चित्रपट आहेत.