​बिप्स-करणच्या चाहत्यांसाठी खूशखबर!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 19:35 IST2016-03-29T02:35:12+5:302016-03-28T19:35:12+5:30

बिपाशा बसू व करणसिंह ग्रोवर यांच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. कोणती, हे तुम्ही ओळखल असेलच...पण थोडे थांबा...दोघांनीही त्यांचे ...

Good for fans of Bipes-Karan !!! | ​बिप्स-करणच्या चाहत्यांसाठी खूशखबर!!!

​बिप्स-करणच्या चाहत्यांसाठी खूशखबर!!!

पाशा बसू व करणसिंह ग्रोवर यांच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. कोणती, हे तुम्ही ओळखल असेलच...पण थोडे थांबा...दोघांनीही त्यांचे रिलेशन अधिकृतरित्या मान्य केलेले नाही. पण ताजी खबर खरी मानाल तर बिप्स व करण दोघेही त्यांच्या रिलेशनबाबत आॅफिशिअली कबुली देण्याच्या मूडमध्ये आहेत. बिप्स आणि करणचे रिलेशन त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नसल्याची बातमी यापूर्वी आली होती. मात्र ताज्या बातमीनुसार, बिप्सची आई अखेर मानली असून तिने करण व बिपाशाच्या नात्याला होकार दिला आहे. या होकारानंतरही करणच्या आईकडून होकार येणे बाकी होते. पण करणच्या मॉमनेही या नात्याला हिरवी झेंडी दिल्याचे कळते. त्यामुळे करण व बिप्स जाम खुश असून दोघांनीही आपले नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोघांनीही याबाबतची अधिकृत घोषणा करण्याची तयारी चालवली आहे. हा योग लवकरच येणार असे संकेत आहेत...सध्या तरी प्रतीक्षा करू या!!!

Web Title: Good for fans of Bipes-Karan !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.