​‘कोल्डप्ले’सोबत स्टेज शेअर करणार सोना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 14:40 IST2016-10-22T14:40:02+5:302016-10-22T14:40:02+5:30

सोनाक्षी सिन्हाचा ‘फोर्स2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटासोबतच सोनाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. होय, ‘फोर्स2’ ...

Gold to share stage with Coldplay! | ​‘कोल्डप्ले’सोबत स्टेज शेअर करणार सोना!

​‘कोल्डप्ले’सोबत स्टेज शेअर करणार सोना!

नाक्षी सिन्हाचा ‘फोर्स2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटासोबतच सोनाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. होय, ‘फोर्स2’ रिलीज झाल्याच्या दुस-याच दिवशी सोना ब्रिटीश रॉक बँड ‘कोल्डप्ले’सोबत स्टेज शेअर करताना दिसणार आहे. ‘कोल्डप्ले’ मुंबईत आयोजित ग्लोबल सिटीजन फेस्टिवल आॅफ इंडिया कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणार आहे. यादरम्यान सोनाक्षी बॉलिवूडच्या काही लोकप्रीय गाण्यांवर परफॉर्म करताना  दिसणार आहे. अद्याप या गाण्यांची निवड झालेली नाही. पण याबद्दल सोनाचा विचार एकदम पक्का आहे. या कॉन्सर्टमध्ये मी माझ्या पप्पाचे(शत्रूघ्न सिन्हा) गाणी गाईल, अशी अपेक्षा करू नका. मी माझ्या पिढीच्याच गाण्यांची निवड करणार. आयोजकांनी मला गाणे निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, असे सोनाने स्पष्ट केले आहे.
सोनाक्षी तिच्या शालेय दिवसांपासून ‘कोल्डप्ले’ची चाहती आहे. ती याबद्दल सांगते, ‘मी कोल्डप्ले’ची खूप मोठी चाहती आहे. या बँडची गाणी मी मस्तपैकी एन्जॉय करते. येल्लो, फिक्स यू आणि द साइंटिस्ट हे माझे फेवरेट नंबर्स आहेत. या बँडसोबत काम करण्याची संधी मला मिळतेय. त्यामुळे मी जाम आनंदात आहे. सोनाने या कॉन्सर्टची प्रॅक्टिसही सुरु केली आहे. आता ही प्रॅक्टिस सोनाच्या किती कामी येतेयं, ते बघूच!



‘कोल्डप्ले’ हा ब्रिटीश रॉक बँड गायक क्रिस मार्टिन आणि गिटारवादक जॉनी बकलँड यांनी १९९६ मध्ये तयार केला होता. ‘पेक्टोराल्ज’नावाने तयार झालेल्या या बँडमध्ये नंतर गाए बेरीर्मैन हा बासरीवादक म्हणून सामील झाला. त्यामुळे या बँडचे नाव बदलून ‘स्टारफिश’ असे केले गेले. यानंतर विल चँपलिन हा ड्रमर बँडमध्ये आला. यानंतर पुन्हा एकदा बँडचे नाव बदलण्यात येऊन ते ‘कोल्ड प्ले’ ठेवण्यात आले.

Web Title: Gold to share stage with Coldplay!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.