हिचं डोकं ठिकाण्यावर आहे का ? देवीच्या प्रतिमेचा अशा प्रकारे वापर केल्याने अभिनेत्रीवर नेटीझन्सचा संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 04:15 PM2021-05-13T16:15:55+5:302021-05-13T16:21:57+5:30

जोनास ब्रदर्सचे गाणे 'सकर फॉर यू'च्या शूटिंगदरम्यानचा असल्याचे बोलले जात आहे. प्रियंका चोप्राच्या या जॅकेटमुळे भारतीच्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर होतोय.

"Gods are not for fashion": Priyanka Chopra wears Goddess Kali on her jacket, picture goes viral | हिचं डोकं ठिकाण्यावर आहे का ? देवीच्या प्रतिमेचा अशा प्रकारे वापर केल्याने अभिनेत्रीवर नेटीझन्सचा संतापले

हिचं डोकं ठिकाण्यावर आहे का ? देवीच्या प्रतिमेचा अशा प्रकारे वापर केल्याने अभिनेत्रीवर नेटीझन्सचा संतापले

googlenewsNext

सेलिब्रेटी नेहमीच स्टायलिश आणि फॅशनच्या नावाखाली वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसते. वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. मात्र कधी कधी याच गोष्टी त्यांच्या अंगाशीही येतात.  बॉलिवूडची पिग्गी चॉप्स सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतचे प्रियकांने निक जोनाससोबत एक फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर निक जोनास आणि प्रियंका ट्रेडिंग कपल ठरतात.

 

 

त्यांच्या फोटोंना नेहमीच रसिकांची पसंती मिळते. दोघांमधलली रोमँटीक केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरते. मात्र नुकताच प्रियंका आणि निक जोनासचा समोर आलेला फोटो पाहून पाहून लोक भडकले आहेत. प्रियंका चोप्राने देवाचा अपमान करत असल्याचं म्हणत तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.


फोटोशूटमध्ये प्रियंकाने परिधान केलेले जॅकेटमुळे प्रियंकाला चाहत्यांच्या रागाचा सामना करावा लागत आहे. तुम्ही जर प्रियंकाचा हा फोटो नीट पाहिला तर काली मातेची प्रतिमा असणारे जॅकेट तिनं परिधान केल्याचे दिसेल. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच नेटीझन्सचा संताप अनावर झाला आणि प्रियंकाला अतिशय तिव्र शब्दांत ट्रोल केले गेले.  

देवीच्या प्रतिमेचा अशा प्रकारे फॅशनसाठी वापर केल्यानं नेटकरी प्रियंकावर संतापले आहेत. याच कारणामुळे लोकांकडून प्रियंका नेटीझन्सच्या निशाण्यावर आली आहे. हा फोटो जोनास ब्रदर्सचे गाणे 'सकर फॉर यू'च्या शूटिंगदरम्यानचा असल्याचे बोलले जात आहे. प्रियंकाच्या या जॅकेटमुळे भारतीच्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर होतोय. म्हणून सोशल मीडियावर प्रियंकाला नेटकऱ्यांची टीकेची झोड उठली आहे.


प्रियंका अनेकदा तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोल झाली आहे. तिच्या सोशल मीडियावर तुम्ही नजर टाकल्यास विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. अतिशय बोल्ड लूक मिळेल असे ड्रेस परिधान करताना ती दिसली. आधी कधीही तिला अशा अंदाजात पाहिले नाही अशा लूकमध्ये पाहून अनेकांना धक्काच बसला होता.

 

विशेष म्हणजे हे सगळं देसी गर्ल प्रियंका चोप्रा करते यावरच विश्वास बसणे कठिण. कारण ब्युटी विथ ब्रेन म्हणून प्रियंका ओळखली जाते.त्यामुळे प्रियंकाकडून अशा चुका होणे नक्कीच चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Web Title: "Gods are not for fashion": Priyanka Chopra wears Goddess Kali on her jacket, picture goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.