‘गौरी खान डिझाईन्स’ला द्या भेट, तेही आलिया भट्ट सोबत!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 12:33 IST2017-10-13T07:03:19+5:302017-10-13T12:33:19+5:30
अलीकडे शाहरूख खानची बेटरहाफ गौरी खानच्या या भव्य डिझाईनर स्टोरला प्रत्यक्ष भेट देण्याची संधी आपल्याला मिळेल तेव्हा मिळेल. पण तूर्तास मात्र या स्टोरची एक झलक आपण पाहू शकणार आहोत आणि विशेष म्हणजे तुमची आमची लाडकी आलिया भट्ट आपल्याला गौरीच्या स्टोरची सैर घडवणार आहे.
.jpg)
‘गौरी खान डिझाईन्स’ला द्या भेट, तेही आलिया भट्ट सोबत!!
अ ीकडे शाहरूख खानची बेटरहाफ गौरी खान हिच्या डिझाईनर स्टोरचे ओपनिंग झाले. गौरीच्या या भव्य डिझाईनर स्टोरला प्रत्यक्ष भेट देण्याची संधी आपल्याला मिळेल तेव्हा मिळेल. पण तूर्तास मात्र या स्टोरची एक झलक आपण पाहू शकणार आहोत आणि विशेष म्हणजे तुमची आमची लाडकी आलिया भट्ट आपल्याला गौरीच्या स्टोरची सैर घडवणार आहे. आहे ना एक्ससाईटींग!
![]()
काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरने गौरीच्या स्टोरला भेट दिली होती. आता आलिया भट्ट गौरीच्या स्टोरमध्ये पोहोचली आणि तिने तिथून आपल्या घरासाठी काही आवश्यक सजावटीचे सामान घेतले. आलियाने गौरीच्या स्टोरचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘एका नव्या भव्य ‘गौरी खान डिझाईन्स’मध्ये घालवलेली एक सुंदर संध्याकाळ’, असे कॅप्शन आलियाने या फोटोंना दिले आहे.
ALSO READ : गौरी खानच्या या ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही व्हाल अवाक !
गौरीनेही आलियाचे आभार मानत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या व्हिडिओमध्ये आलियाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘रोज या मार्गाने जातांना, हे स्टोर नजरेत भरायचे. या स्टोरला भेट देण्याचे खूप दिवसांपासून मनात होते. आज तो दिवस आला. गौरी तुझ्या सौंदर्यदृष्टीची तारीफ करावी, तितकी कमी आहे. तुझ्या सौंदर्यदृष्टीमुळे अनेकांचे सुंदर घराचे स्वप्न साकार होत आहे. एक दिवस माझे घरही तू सजवशील, अशी मला आशा आहे. मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतेय,’ असे आलियाने म्हटले आहे.
गौरी खानचे हे ‘गौरी खान डिझाईन्स’ नामक स्टोर मुंबईच्या जुहू भागात आहे. आत्ता आत्तापर्यंत गौरी खान शाहरूख खानची पत्नी म्हणूनच ओळखली जायची. पण अलीकडे गौरीने इंटीरिअर डिझाईनर म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रणबीर कपूरपासून करण जोहरच्या मुलांच्या खोलीपर्यंतचे इंटीरिअर गौरी केले आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानींची पत्नी नीता अंबानी यांनीही गौरीच्या स्टोरला भेट दिली होती. नीता अंबानींचे स्वागत करण्यासाठी खास शाहरूख व अबराम स्टोरमध्ये हजर होते. याशिवाय काजोल, संजय लीला भन्साळी, करण जोहर अशा अनेक सेलिब्रिटींनी गौरीच्या स्टोरला भेट दिली होती.