मुलींचा ‘दिल चाहता है’ मजेदार आयडिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 21:41 IST2016-11-12T21:41:12+5:302016-11-12T21:41:12+5:30
मुलींना घेऊन ‘दिल चाहता है’ हा चित्रपट तयार करणे मजेदार आयडीया असून त्याचा अनुभव जबरदस्त असेल, असे अभिनेता व ...

मुलींचा ‘दिल चाहता है’ मजेदार आयडिया
एका कार्यक्रमात फरहान म्हणाला, आपण समाजातील मुलींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. बॉलिवूडच्या चित्रपटात महिलांची भूमिका नेहमीच मजबूत व महत्त्वाची ठरली आहे. मी एक पुरुष असल्याने मला पुरुषाच्या नजरेतून विचार करणे सोपे असते. ‘दिल चाहता है’मध्ये तीन मित्रांना फोकस केले होते. त्यांची मैत्री दाखविली होती. मात्र, मला मुलींच्या मैत्रीवर आधारित ‘दिल चाहता है’चे दिग्दर्शन करायला नक्कीच आवडेल.
या चित्रपटाच्या सिक्वलसंदर्भात फरहान म्हणाला, ‘दिल चाहता है’च्या रिमेकचा उल्लेख आलिया भट्टने एका मुलाखती दरम्यान केला होता. ती म्हणाली होती मी फरहानशी याबद्दल बोलली आहे, आणि तो मजेदार असेल. मला वाटते तिची हा आयडीया चांगला आहे. कदाचित या चित्रपटाचा पुढचा भागात मुली असतील. असे प्रयोग करणे बॉलिवूडसाठी चांगले ठरू शकते.
2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल चाहता है’मध्ये आमिर खान, सैफ अली खान व अक्षय खन्नासह प्रिती झिंटा व सोनाली कुळकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मागील काही दिवसांपासून ‘दिल चाहता है’च्या सिक्वलची तयारी सुरू झाली असल्याच्या बातम्या येत आहेत. यासाठी आलिया भट्ट, श्रद्धा कपूर व परिनीती चोप्रा यांच्या भूमिका असतील अशी चर्चा आहे. फरहान सध्या ‘रॉक आॅन 2’च्या प्रमोशनात व्यस्त आहे. फरहानने रॉक आॅन, डॉन या चित्रपटांचे सिक्वल तयार केले आहेत हे विशेष.