'गजनी' फेम असिन पतीपासून घटस्फोट घेणार? या चर्चेवर अभिनेत्रीनं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 12:13 PM2023-06-28T12:13:51+5:302023-06-28T12:14:15+5:30

अभिनेत्री असिन (Asin) पतीपासून घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

'Ghajani' fame Asin will divorce her husband? The actress left silence on this discussion | 'गजनी' फेम असिन पतीपासून घटस्फोट घेणार? या चर्चेवर अभिनेत्रीनं सोडलं मौन

'गजनी' फेम असिन पतीपासून घटस्फोट घेणार? या चर्चेवर अभिनेत्रीनं सोडलं मौन

googlenewsNext

आमिर खानच्या गजनी चित्रपटातून रसिकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री असिन (Asin) पतीपासून घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. असिनने बिझनेसमन राहुल शर्मासोबत २०१६ साली लग्न केले होते आणि लग्नानंतर ती सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली. मात्र आता ती तिच्या पतीपासून वेगळी होणार असल्याचे बोलले जात आहे. तिने सोशल मीडियावरील त्याच्यासोबतचे सर्व फोटो हटवल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान आता या चर्चेवर अभिनेत्रीने मौन सोडले आहे. तिने हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे.

अभिनेत्री असिनने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. तिने म्हटले की, आता आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या मध्यावर, अक्षरशः एकमेकांच्या समोर बसून नाश्त्याचा आस्वाद घेत असताना काही अत्यंत काल्पनिक आणि पूर्णपणे निराधार 'बातम्या' समोर आल्या. आम्ही आमच्या कुटुंबासह घरी बसून आमच्या लग्नाची योजना आखत होतो. त्या वेळेची आठवण करून देत होतो आणि आमचे ब्रेकअप झाल्याचे ऐकले. सिरियसली?! कृपया यापेक्षा चांगलं करा. (अप्रतिम सुट्टीतील ५ मिनिटं वाया घालवल्याबद्दल निराश झालो!) तुमचा दिवस चांगला जावो.
असिनच्या पोस्टने घटस्फोटाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम लावला आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तिने सोशल मीडियावर तिच्या लग्नातील आणि पतीसोबतचे सर्व फोटो डिलीट केले. फक्त ऋषी कपूर यांच्यासोबत ती आणि नवरा असलेला फोटो ठेवला आहे. तिने फोटो डिलिट केल्यामुळे या चर्चेला उधाण आले. 


लग्नानंतर असिन बॉलिवूडमधून गायब आहे. मात्र आजही तिचे चाहते तिला खूप मिस करतात. शेवटची ती २०१५ साली ऑल इज वेल चित्रपटात झळकली होती. यात तिच्यासोबत अभिषेक बच्चन, ऋषी कपूर आणि सुप्रिया पाठक मुख्य भूमिकेत होते. 

Web Title: 'Ghajani' fame Asin will divorce her husband? The actress left silence on this discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Asinअसिन