'गहराइयां' फेम अनन्या पांडेचे झाले ब्रेकअप, तीन वर्षांपासून या अभिनेत्यासोबत होती रिलेशनशीपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 04:49 PM2022-04-05T16:49:54+5:302022-04-05T16:50:28+5:30

अनन्या पांडे (Ananya Panday) गेल्या ३ वर्षांपासून बॉलिवूडच्या या अभिनेत्याला डेट करत होती.

'Gehraiyaan' fame Ananya Pandey had a breakup, had been in a relationship with the actor for three years. | 'गहराइयां' फेम अनन्या पांडेचे झाले ब्रेकअप, तीन वर्षांपासून या अभिनेत्यासोबत होती रिलेशनशीपमध्ये

'गहराइयां' फेम अनन्या पांडेचे झाले ब्रेकअप, तीन वर्षांपासून या अभिनेत्यासोबत होती रिलेशनशीपमध्ये

googlenewsNext

अनन्या पांडे (Ananya Panday) आणि ईशान खट्टर (Ishaan Khattar) यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून व्हायरल होत होत्या. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते कधीच स्वीकारले नाही. त्याचवेळी दोघांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी तीन वर्षांचे नाते संपवले आहे.

अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांनी पहिल्यांदाच 'खाली पीली'मध्ये एकत्र काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. अनेकदा ते एकत्र स्पॉट झाले होते. त्याचवेळी नवीन वर्षही एकत्र साजरे केल्याचे सांगण्यात आले, त्यासाठी दोघेही मालदीवला गेले होते. मात्र आता दोघांच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचे ब्रेकअप परस्पर संमतीने झाले. दोघांनी परस्पर संमतीने ठरवले आहे की ते आता मित्रच राहतील आणि हे नाते इथेपर्यंत टिकवून ठेवतील. त्याचबरोबर या दोघांनीही आगामी काळात एकत्र चित्रपटाची ऑफर दिल्यास ते एकत्र काम करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असा निर्धारही केला आहे.
विशेष म्हणजे ब्रेकअपच्या बातमीच्या एक महिना आधी हे कपल शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये एकत्र दिसले होते. सोशल मीडियावर या फोटोंचा बोलबाला होता. ईशानची आई आणि अभिनेत्री नीलिमा अजीम यांनी देखील नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनन्या पांडेला  त्यांच्या कुटुंबाचा एक भाग असल्याचे सांगितले.

Web Title: 'Gehraiyaan' fame Ananya Pandey had a breakup, had been in a relationship with the actor for three years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.