गब्बरने पैशांचे आमिष दाखवून ठाकूरला मागितले त्याचे हात; मिळाले ‘हे’ उत्तर, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 19:34 IST2018-06-05T14:03:55+5:302018-06-05T19:34:04+5:30

अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिच्या को-स्टारचा एक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, त्यामध्ये हे दोघे चक्क गब्बर आणि ठाकूर बनल्याचे दिसत आहे.

Gabbar asks for money; Got 'this' answer, watch the video! | गब्बरने पैशांचे आमिष दाखवून ठाकूरला मागितले त्याचे हात; मिळाले ‘हे’ उत्तर, पाहा व्हिडीओ!

गब्बरने पैशांचे आमिष दाखवून ठाकूरला मागितले त्याचे हात; मिळाले ‘हे’ उत्तर, पाहा व्हिडीओ!

याच काळापासून अभिनेत्री अमिषा पटेल पडद्यावरून गायब आहे. मात्र लवकरच ती सिल्व्हरस्क्रीनवर बघावयास मिळणार आहे. अमिषाच्या ‘भैयाजी सुपरहिट’ या चित्रपटावर सध्या काम सुरू असून, बºयाच काळापासून अडकलेल्या तिच्या प्रॉडक्शन हाउसच्या ‘देसी मॅजिक’ या चित्रपटाची शूटिंग सध्या विदेशात सुरू आहे. चित्रपटात अमिषा एका फॅशन डिझायनरच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. या चित्रपटावर बºयाच काळापासून काम केले जात आहे. मात्र आता चित्रपटाच्या शूटिंगला मुहूर्त लागला आहे. दरम्यान, अमिषाने शूटिंगदरम्यानचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये ती को-स्टार रजत रवेलसोबत ठाकूर आणि गब्बरचा खेळ खेळताना दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये दोघेही महानायक अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या ‘शोले’ या चित्रपटातील लोकप्रिय पात्र गब्बर (अमजद खान) आणि ठाकूर (संजीव कुमार) च्या भूमिका साकारताना दिसत आहेत. थंडी असल्यामुळे अमिषाने शॉल पांघरून घेतली आहे, तर रजतने चादर गुंडाळून घेतले आहे. त्याचा लूक ‘शोले’मधील ठाकूरसारखाच दिसत आहे. अमिषा त्याला चेष्टामस्करीत म्हणतेय की, ‘ये हाथ मुझे दे दे ठाकूर.’ त्यावर रजत म्हणतो ‘नहीं.’ हे उत्तर ऐकून अमिषा त्याला पैशांचे आमिष दाखविते. परंतु अशातही रजत आपले हाथ कापण्यास तयार होत नाही. 
 

सध्या या दोघांचा हा मजेशीर व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. दरम्यान, अमिषा पटेल २०१३ नंतर एकाही चित्रपटात बघावयास मिळाली नाही. तिने तिचे प्रॉडक्शन हाउसही सुरू केले आहे, परंतु एकही प्रोजेक्ट तिला पूर्णत्वास नेता आला नाही. आता तिच्या ‘भैयाजी सुपरहिट’ आणि ‘देसी मॅजिक’ या चित्रपटावर काम केले जात आहे. मात्र त्याच्या रिलीज डेटबद्दल अद्यापपर्यंत कुठलीही माहिती समोर आली नाही. अमिषा ‘गदर’ आणि ‘कहो ना प्यार हैं’ या चित्रपटांमुळे प्रसिद्धीझोतात आली होती. 

Web Title: Gabbar asks for money; Got 'this' answer, watch the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.