​ चार राज्यांत ‘पद्मावत’ नाहीच; BookmyShowला धमकी ! उर्वरित देशात ७००० स्क्रीन्सवर चित्रपट रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 10:08 IST2018-01-25T04:33:31+5:302018-01-25T10:08:55+5:30

संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ला होत असलेला विरोध अद्यापही थांबलेला नाही. हिंसक आंदोलन आणि तणावादरम्यान आज देशभरातील चित्रपटगृहांत हा  चित्रपट  ...

Four states are not 'Padmavat'; BookmyShow threatens! Release of 7000 screens in the rest of the country! | ​ चार राज्यांत ‘पद्मावत’ नाहीच; BookmyShowला धमकी ! उर्वरित देशात ७००० स्क्रीन्सवर चित्रपट रिलीज!

​ चार राज्यांत ‘पद्मावत’ नाहीच; BookmyShowला धमकी ! उर्वरित देशात ७००० स्क्रीन्सवर चित्रपट रिलीज!

जय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ला होत असलेला विरोध अद्यापही थांबलेला नाही. हिंसक आंदोलन आणि तणावादरम्यान आज देशभरातील चित्रपटगृहांत हा  चित्रपट  देशभरातील ७००० स्क्रीन्सवर रिलीज झाला. तथापि करणी सेनेने पुकारलेला देशव्यापी बंद आणि अनेक ठिकाणी आंदोलनाला लागलेले हिंसक वळण बघता, गुजरात,राजस्थान, मध्यप्रदेश व गोव्यातील चित्रपटगृहांच्या मालकांनी हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
चित्रपटाला विरोध केल्यानंतर करणी सेनेने चित्रपटांची आॅनलाईन तिकिटे बुक करणा-या BookmyShow या वेबसाईटला लक्ष्य केले आहे. BookmyShowने आॅनलाईन शो बुकिंग बंद करावे. अन्यथा यापुढे तुम्ही कधीच बुकिंग करण्याच्या लायकीचे राहणार नाही, अशी धमकी करणी सेनने दिली आहे.
दरम्यान ‘पद्मावत’विरोधात देशभर हिंसक निदर्शने सुरु आहेत. काल बुधवारी करणी सेनेने ठिकठिकाणी हिंसक प्रदर्शने केलीत. जमावाने दगड आणि काठ्यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हल्ला झाला तेव्हा बसमध्ये नर्सरी ते आठवी इयत्तेचे एकूण दहा विद्यार्थी  तसेच   एक शिक्षक, कंडक्टर आणि मदतनीसही होता. शिक्षक, मदतनीस आणि कंडक्टरच्या सतर्कतेमुळे या हल्ल्यातील विद्यार्थी कसेबसे बचावले.
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादेत निदर्शकांनी एका बसची तोडफोड करेली. रात्री उशीरा कडकड मॉडल गावानजिक एका बसला आग लावण्याचा प्रयत्न केला. या हिंसक प्रदर्शनांमुळे चित्रपटगृहांचे मालक दहशतीत आहे. दरम्यान पोलिस आणि प्रशासनाने चित्रपट प्रदर्शनासाठी सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त केलाय. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद प्रशासन हायअलर्टवर आहे. राजधानी दिल्लीत चित्रपटगृहांबाहेर शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले आहे. 
एकीकडे देशभर ‘पद्मावत’ला विरोध होत असताना प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. काही राज्यांचा अपवाद वगळता अन्य राज्यांत या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल आहेत.

ALSO READ : ​‘पद्मावत’ विरोधात देशभर तणाव! विरोधक आक्रमक ; पण शो हाऊसफुल!!

करणी सेनेत मतभेद
‘पद्मावत’ला विरोध करण्यावरून करणी सेनेत दोन गट पडल्याचेही वृत्त आहे. अहमदाबादेतील हिंसाचारानंतर सरकारने वेगवेगळ्या राजपूत संघटनांशी चर्चा केली. यादरम्यान राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष राज शेखावत यांनी २५ जानेवारीच्या भारत बंदला आपले समर्थन नसल्याचे जाहिर केले. याऊलट करणी सेनेचे लोकेंद्र सिंह कलवी यांच्या गटाचे अर्जुन सिंह गोहिल यांनी मात्र भारत बंद कायम राहिल, असा ठाम पवित्रा घेतला.

Web Title: Four states are not 'Padmavat'; BookmyShow threatens! Release of 7000 screens in the rest of the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.