लगेच मला अनफॉलो करा! जाम भडकली शमिता शेट्टी !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 16:49 IST2018-06-18T11:19:44+5:302018-06-18T16:49:44+5:30
शिल्पा शेट्टीची लहान बहीण शमिता शेट्टी सध्या जाम भडकलेली आहे. याला कारण म्हणजे, सोशल मीडियावरचे निगेटीव्ह कमेंट्स.
.jpg)
लगेच मला अनफॉलो करा! जाम भडकली शमिता शेट्टी !!
श ल्पा शेट्टीची लहान बहीण शमिता शेट्टी सध्या जाम भडकलेली आहे. याला कारण म्हणजे, सोशल मीडियावरचे निगेटीव्ह कमेंट्स. त्याचे झाले असे की, काल शमिताने फादर्सच्या निमित्ताने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात शमिता बहीण शिल्पा शेट्टीसोबत वडिलांच्या प्रतिमेवर फुल अर्पण करताना दिसली होती. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये शमिताने ‘मिस यू डॅड’ असे लिहिले होते. पण शमिताने हा व्हिडिओ पोस्ट केला आणि लगेच ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. शमिता आणि शिल्पा दोघीही हसून हसून पित्याच्या प्रतीमेला पुष्पांजली वाहत आहेत,हे पाहून काही लोकांनी शिल्पा व शमिता दोघींनाही धारेवर धरले. पण लोकांच्या या नकारात्मक प्रतिक्रिया शमिताला चांगल्याच खटकल्या. इतक्या की, ती रागाने लालबुंद झाली आणि तिने ट्रोलर्सला खरमरीत उत्तर दिले. ‘खरे ती मी कायम नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करते. पण तुम्ही नकारात्मक प्रतिक्रियांसाठी चुकीचा दिवस निवडला. जी मुलगी आपल्या पित्याची पूजा करते, तिच्याबद्दल तुम्ही हीन प्रतिक्रिया दिल्यात. मला अशा प्रतिक्रिया देणा-यांना स्वत:चे फॉलोअर्स म्हणतांना लाज वाटतेय. कृपया मला त्वरित अनफॉलो करा. कारण मला निगेटीव्ह लोक अजिबात आवडत नाही. प्रगल्भ व्हा आणि तुमचा वेळ एखाद्या सकारात्मक गोष्टींमध्ये घालवा,’ असे शमिता म्हणाली. हे माझे अकाऊंट आहे आणि इथे काय पोस्ट करायचे ते माझे मी ठरवेल. मला फॉलो करण्यासाठी मी कुणावरही बळजबरी केलेली नाही, असेही तिने सुनावले.
शमिता ही तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली. मनोज वाजपेयीसोबत तिचे अफेअर असल्याची चांगलीच चर्चा झाली होती. तसेच आफताब शिवदासानी, हरमन बावेजा. उपेन पटेल अशा अभिनेत्यांसोबतदेखील तिचे नाव जोडले गेले होते.
शमिता एक अभिनेत्री म्हणून स्वतःला प्रस्थापित करू शकली नसल्याने तिने एक आयटम गर्ल म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण मेरे यार की शादी है या चित्रपटातील शरारा-शरारा आणि साथिया या चित्रपटातील चोरी पे चोरी ही गाणे वगळता तिच्या कोणत्याही गाण्याला तितकीशी लोकप्रियता मिळाली नाही.
ALSO READ : OMG! शमिता शेट्टीने अंडरगारमेंट्स न घातल्यामुळे झाली होती तिची फजिती
शमिताने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटातही काम केले आहे. तसेच तिची बहीण शिल्पा शेट्टीने बिग ब्रदर या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवल्यानंतर तीदेखील बिग बॉसमध्ये झळकली होती. पण काही कारणांनी तिला बिग बॉसचे घर सोडावे लागले होते. तसेच झलक दिखला जा या कार्यक्रमात तिने तिचे नृत्यकौशल्य दाखवले होते. बॉलिवूड, छोटा पडदा या सगळ्या माध्यमातून अपयश मिळवल्यानंतर शमिताने अभिनयापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आता ती इंटिरियर डिझायनर म्हणून स्वतःचे करियर बनवण्याचा प्रयत्न करत आहे.