पाचशे, हजारामुळे लांबली या चित्रपटांची रिलीज डेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 17:42 IST2016-11-09T17:25:12+5:302016-11-09T17:42:17+5:30

पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद झाल्यामुळे सर्वसामान्यांसह बॉलिवूडमध्येही खळबळ माजली आहे. कारण चित्रपट पाहणारे असोत वा चित्रपट बनवणारे सगळ्यांनाच ...

Five hundred and seventy-five films are released in the long run! | पाचशे, हजारामुळे लांबली या चित्रपटांची रिलीज डेट!

पाचशे, हजारामुळे लांबली या चित्रपटांची रिलीज डेट!

चशे आणि हजाराच्या नोटा बंद झाल्यामुळे सर्वसामान्यांसह बॉलिवूडमध्येही खळबळ माजली आहे. कारण चित्रपट पाहणारे असोत वा चित्रपट बनवणारे सगळ्यांनाच पैशाची गरज आहे. कदाचित त्याचमुळे दोन चित्रपटांना आपली रिलीज डेट बदलवावी लागली आहे. होय, ‘30 मिनट’ आणि ‘सांसे’ या दोन चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.  हितेन पेंटल, हृषिता भट्ट यांची मुख्य भूमिका असलेला ‘३० मिनट’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजे ११ नोव्हेंबरला रिलिज होणार होता. आता हा चित्रपट ९ डिसेंबरला रिलीज होईल. रजनीश दुग्गल आणि सोनालिका भदौरिया यांचा ‘सांसे’ या चित्रपटाचे प्रदर्शनही लांबणीवर टाकण्यात आले आहे. हा चित्रपट नेमका किती तारखेला रिलीज होईल, हे कळलेले नाही. पण चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. 
पाचशे व हजाराच्या नोटा बंद झाल्याच्या निर्णयाचा बॉक्सआॅफिस कलेक्शनवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. लहान बजेटच्या चित्रपटांना हे परवडण्यासारखे नाही. त्यामुळेच ‘३० मिनिट’ व ‘सांसे’चे प्रदर्शन लांबवणे निर्मात्यांना भाग पडले आहे.



‘30 मिनट’ हा चित्रपट टाईम मॅनेजमेंटवर आधारित आहे. हा चित्रपट एका मुलाची कथा आहे. त्याचे आई-वडिल वेळेचे इतके काटेकोर असतात की मुलाकडून ते तशीच अपेक्षा करतात. एका मिनिटाचा विलंबही त्यांना सहन होत नाही. याच दबावापोटी या मुलाच्या हातून हत्या घडते, असे याचे कथानक आहे.


 
‘सांसे’ हा एक हॉरर चित्रपट आहे.
 

Web Title: Five hundred and seventy-five films are released in the long run!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.